आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय हजारे ट्राॅफी:महाराष्ट्र संघाची183 धावांनी मिझाेरामवर मात

रांची14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकित बावणेच्या (९५) नेतृत्वात फाॅर्मात असलेल्या महाराष्ट्र, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबई संघाने साेमवारी विजय हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत दणदणीत विजयाची नाेंेद केली. दुसरीकडे अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखाली विदर्भ संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यासह विदर्भाचा स्पर्धेत तिसरा पराभव झाला. महाराष्ट्र संघाने सामन्यात १८३ धावांनी मिझाेरामवर मात केली. महाराष्ट्राने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३२१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मिझाेेराम संघाला ८ गड्यांच्या माेबदल्यात १५८ धावांपर्यंत मजल मारता आली. तसेच मुंबई संघाने सामन्यात ९ गड्यांनी पुद्दुचेरीला पराभूत केले. पुद्दुचेरीने प्रथम फलंदाजी करताना १३९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईने २४.२ षटकांत १ गडी गमावत सामना जिंकला. दरम्यान आसाम टीमने ७ गड्यांनी विदर्भावर मात केली. विदर्भ संघाने ९ गडी गमावत प्रथम फलंदाजी करताना २६१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात आसाम संघाने ४७.३ षटकांत ३ गडी गमावत २६२ धावा काढल्या. यादरम्यान विदर्भाच्या कर्णधार अक्षयची (६९) एकाकी झंुज व्यर्थ ठरली. इतर फलंदाजांच्या सुमार खेळीमुळे विदर्भाला पराभवाचा सामना करावा लागला. आसाम संघाने सरस खेळीतून विजय साकारला.

राहुल-कर्णधार अंकितची द्विशतकी भागीदारी; विकीच्या चार विकेट : नाणेफेक जिंकून महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पवन शाह (३१) आणि राहुल त्रिपाठीने (१०७) ४८ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार अंकित बावणेने ९५ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने सलामीवीर राहुल त्रिपाठीसाेबत दुसऱ्या विकेटसाठी २१८ धावांची माेठी भागीदारी रचली. राहुलने ९९ चेंडूंत ८ चाैकार आणि ३ षटकारांसह १०७ धावांची खेळी केली. त्याला रिटायर्ड हर्ट झाल्याने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. अंकितने १०५ चेंडूंत ११ चाैकारांसह ९५ धावांची खेळी केली. अहमदनगरच्या आझीम काझीने (६७) अर्धशतक साजरे केले. महाराष्ट्राकडून विकी आेस्तवालने ४, राजवर्धन, निकित व सत्यजित बच्छावने प्रत्येकी १ बळी घेतला. आठ दिवसात जगदीशनचे पाचवे शतक तामिळनाडू संघाच्या युवा फलंदाज जगदिशनने आठ दिवसांत पाचवे शतक साजरे केले. त्याने आता अरुणाचल प्रदेश संघाविरुद्ध १९६.४५ च्या स्ट्राइक रेटने १४१ चेंडूंत २५ चाैकार व १५ षटकारांसह २७७ धावा काढल्या. ही वनडेतील वैयक्तिक सर्वाेच्च खेळी ठरली. तामिळनाडूने ४३५ धावांनी विजय मिळवला. तामिळनाडूने ५०६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अरुणाचलचा ७१ धावांत खुर्दा उडाला.

बातम्या आणखी आहेत...