आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maharashtra's Dominance In The Country Increased Pratap Jadhav News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:देशात महाराष्ट्राचे वर्चस्व वाढले, खेलो इंडियात सर्वाधिक ४८ खेळाडूंचा समावेश : प्रताप जाधव

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनात आरोग्याचे महत्त्व पटल्याने सायकलिंगला आले चांगले दिवस

भारतीय सायकलिंगचे एकविसाव्या शतकात वर्चस्व वाढत आहे. ट्रॅक प्रकारात भारताचे खेळाडू अव्वल-१० मध्ये पोहोचले. भारतात महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी दबदबा वाढला. खेलो इंडियांतर्गत विविध केंद्रांवर सर्वाधिक ४८ खेळाडू हे महाराष्ट्राचे आहेत. २ वर्षांच्या कोरोनाकाळात नागरिकांना आरोग्याचे महत्त्व पटल्याने सायकलिंगमध्ये निश्चित वाढ झाल्याचे, भारतीय सायकलिंग संघटनेचे कोषाध्यक्ष प्रताप जाधव यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

राज्य रोड रेस सायकलिंग संघ निवड चाचणीसाठी जाधव औरंगाबादला अाले असता, त्यांनी संवाद साधला. जाधव म्हणाले की, भारतीय सायकलिंग संघटना व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र खेळाडूंच्या विकासावर व खेळाच्या प्रचारावर अधिक भर देत आहेत. राज्य पूर्वी केवळ मुंबई-पुणे या शहरात सायकलिंग होत असे, स्पर्धा होत होत्या. आता मुलांना-पालकांना खेळाची व उच्च दर्जाच्या सायकलची माहिती होण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांत स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.

शालेय स्पर्धेमुळे खेळाला फायदा झाला. आता ४०-५० मुलांच्या ठिकाणी आज ४५० मुले स्पर्धेत सहभागी हाेत आहेत. स्पर्धा वाढल्याने गुणवंत खेळाडू पुढे येत आहेत. राज्य संघटना जायंट ग्रुपच्या सहकार्याने खेळाडूंना आर्थिक मदत केली, सायकल उपलब्ध करून दिल्या, परदेशात सरावाची संधी दिली.

खेळाडूंना आर्थिक मदतीसह महागड्या सायकल उपलब्ध
सरकारने सुरू केलेल्या खेलो इंडियाअंतर्गत उपक्रमाचा गरीब व गुणवंत सायकलपटूंना मोठा फायदा झाला. त्यांना आर्थिक मदत मिळाली आणि १५-२० लाखांच्या आधुनिक महागड्या सायकल सरकारने खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर, देशात गुवाहाटी, महाराष्ट्र, रांची, पतियाळा, त्रिवेंद्रम येथे खेलो इंडिया सेंटर सुरू करत असून राज्यातील पुण्याचा बालेवाडीमधील सायकल ट्रॅक ताब्यात घेतले आहे. शासनाने पैसा उपलब्ध करून ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...