आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maharashtra's Khae Kha Team Enters Finals; A Chance For A Gold Medal In Archery Too,

खेलाे इंडिया यूथ गेम्स:महाराष्ट्राचे खाे-खाे संघ फायनलमध्ये दाखल; तिरंदाजीतही सुवर्णपदकाची संधी,

दिव्य मराठी नेटवर्क | भाेपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याेगासन, सायकलिंगमध्ये सुवर्ण; महाराष्ट्र अव्वलस्थानी

गत दाेनवेळच्या चॅम्पियन महाराष्ट्र संघाने गुरुवारी पाचव्या सत्राच्या खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये एकाच दिवशी १८ पदकांची कमाई केली. यातून महाराष्ट्र संघाने २१ पदकांसह पदकतालिकेत अव्वलस्थानी धडक मारली. रुद्रांक्षी भावेसह युवा याेगपटूंनी सर्वाेत्तम कामगिरी करत याेगासनांमध्ये १२ पदकांची कमाई केली. यामध्ये प्रत्येकी चार सुवर्ण, राैप्य आणि कांस्यपदकांचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट पूजा दानाेळेसह संज्ञा पाटीलने सरस खेळीतून महाराष्ट्र संघाची सायकलिंगमध्ये सुवर्णपदकाची हॅट््ट्रिक साजरी केली. महाराष्ट्र संघाने या इव्हेंटमध्ये चार पदके जिंकली. तसेच गत चार वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्र खाे-खाे संघांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खाे-खाे संघांना शुक्रवारी सुवर्णपदकाची संधी आहे. स्पर्धेत महाराष्ट्राने ८ सुवर्णपदकांसह एकूण २१ पदके मिळवून पदकतालिकेत अव्वल स्थान मिळविले. महाराष्ट्राने ८ सुवर्ण, ६ रौप्य, ७ कांस्यपदके जिंकली आहेत. योगासन प्रकारात महाराष्ट्राच्या योगपटूंनी देदीप्यमान यश मिळवताना सुवर्ण, रौप्य व कांस्य अशा तिन्ही पदकांत चौकार लगावताना एकाच दिवशी १२ पदकांची कमाई केली.

खो-खो : सलग पाचव्या सुवर्णपासून महराष्ट्र संघ एका पावलावर : महाराष्ट्र संघ सुवर्णपदकापासून एक सामना दूर आहे. उपांत्य फेरीत मुलींनी प्रीती काळे, अश्विनी शिंदे, दीपाली राठोड यांच्या तुफानी खेळाने कर्नाटकाचे आव्हान १ डाव एका गुणाने परतवून लावले. मुलांनी ओडिशाचे आव्हान १ डाव ६ गुणांनी परतवून लावले.

योगासनांत वर्चस्व : योगासन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली. कलात्मक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी पहिली तिन्ही स्थाने पटकावली. यामध्ये रुद्राक्षी भावे ही सुवर्ण, तर निरल वाडेकर रौप्य आणि स्वरा गुजर कांस्यपदकाची मानकरी ठरली. निरलला रौप्यवर समाधान मानावे लागले. तृप्ती व देवांशी वाकळेने तालबद्ध प्रकारातील दुहेरीत सोनेरी यशाची कामगिरी केली. यात स्वरा गुजर व प्रांजलला रौप्यवर समाधान मानावे लागले. सायकिलंग - पूजा, संज्ञा चॅम्पियन: सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजाने मुलींच्या स्क्रॅच प्रकारात सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात मुलांमध्ये ओम कांस्यपदकाचा मानकरी ठरला. टाइम ट्रायल प्रकारात संज्ञाने सोनेरी यश मिळविले. पूजा, संज्ञाने अदिती डोंगरेच्या साथीत सांघिक स्प्रिंट प्रकारातही सुवर्णपदक मिळवून पहिल्या दिवशी दिल्लीतल्या वेलोड्रमवर महाराष्ट्राचा झेंडा फडकावला.

नाशिकची तनीषा अंतिम फेरीत तनीषा कोटेचा हिने एकेरीची अंतिम फेरी गाठताना महाराष्ट्राचे आणखी एक पदक निश्चित केले. मुलांच्या विभागात जश मोदी ब्राँझपदकाची लढत खेळणार आहे. मुलींच्या एकेरीत संभाव्य विजेत्या पृथा वर्टिकरला उपांत्यपूर्व फेरीत हरियानाच्या प्रिथोकी चक्रवर्तीने पराभवाचा धक्का दिला. मात्र, प्रिथोकीला हरवून तनीषाने अंतिम फेरी गाठली. तनीषाने ही लढत १२-१०, ६-११, ५-११, १२-१०, ११-१३, ११-८, ११-९ अशी सात गेमच्या कडव्या प्रतिकारानंतर जिंकली. मुलांच्या एकेरीत जशला उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशाच्या दिव्यांश श्रीवास्तवकडून १०-१२-२-११,५-११, २-११ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता जश ब्राँझपदकाची लढत खेळेल. जिम्नॅस्टिकमध्ये आगेकूच : महाराष्ट्राच्या सारा राऊळ आणि रिया केळकर, तर मुलांमध्ये आर्यन दवंडे, मानस मनकवळे यांनी वैयक्तिक सर्वसाधारण विभागात अंतिम फेरी गाठली. आर्यनने पात्रता फेरीत ६९.७० गुणांसह पहिले स्थान पटकावले. बाॅक्सिंग : अन्वर, उस्मान उपांत्य फेरीत अन्वर शेख, उस्मान अन्सारीने उपांत्य फेरी गाठत महाराष्ट्राची मुष्टियुद्ध प्रकारातील आणखी दोन पदके निश्चित केली. मुलांच्या ४८ किलो वजनी गटात अन्वरने मध्य प्रदेशाच्या लोकेश पालचा एकतर्फी लढतीत पराभव केला. बॅडमिंटन : नाइशा अंतिम फेरीत : आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ८३व्या स्थानी असलेल्या १४ वर्षीय नाइशा कौरने पदार्पणातच बॅडमिंटन एकेरीत मुलींच्या विभागातून अंतिम फेरी गाठली. तिने उत्तर प्रदेशाच्या गार्गीचा २१-११, २१-११ने पराभव केला.

नेमबाजी - ईशाला रौप्य : नेमबाजीत १० मीटर एअर रायफल प्रकारात पहिल्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठणाऱ्या ईशा टांकसाळेला अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदकाच्या लढतीत ईशाला मध्य प्रदेशाच्या गौतमी भानोतकडून १४-१६ असा दोन गुणांनी पराभव पत्करावा लागला. मुलांच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात महाराष्ट्राचा स्वराज भोंडवे १८ गुणांसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

बातम्या आणखी आहेत...