आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maldives Government Ordered Sunil Chhetri's Bangalore FC To Leave The Country For Breaking Corona Rule

प्रोटोकॉलचे उल्लंघन:मालदीवचे सुनील छेत्रीच्या बंगळुरू एफसीला देश सोडण्याचे आदेश

मालेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फुटबॉल एएफसी कप स्पर्धेत सहभागी टीमकडून प्रोटोकॉलचे उल्लंघन
  • खेळाडूंची सर्रास मार्केटमध्ये खरेदी; मालदीवची कडक कारवाई

सध्या काेराेनाचा धाेका वेगाने वाढत अाहे. अशा गंभीर परिस्थितीला अाटाेक्यात अाणण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात अाली. याच काेविड प्राेटाेकाॅलचे दुसऱ्या देशामध्ये उल्लंघन करणे सुनील छेत्रीच्या बंगळुरू फुटबॉल क्लबला चांगलेच महागात पडले. मालदीवने अापल्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या बंगळुरू संघाला तत्काळ देश साेडण्याचे अादेश दिले अाहेत.

छेत्रीचा बंगळुरू एफसी संघ एएफसी कप स्पर्धेत खेळण्यासाठी मालदीव येथे दाखल झाला हाेत. मात्र, यादरम्यान हाॅटेलमध्ये न राहता टीमचे खेळाडू हे स्थानिक मार्केटमध्ये खरेदीसाठी गेले हाेते. यात टीमच्या मिडफिल्डर एरीकचा मुक्त वावर समाेर अाला अाहे. यादरम्यान केलेल्या गैरवर्तनाचा टीमला अाता माेठा फटका बसला अाहे. काेराेनाचा धाेका वाढू नये यासाठी सध्या मालदीव येथे नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात अाहे. याशिवाय उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.

त्यामुळे कडक कारवाई : महलूफ
इंडियन सुपर लीगच्या बंगळुरू एफसीने अामच्या देशात काेविडसाठी तयार केलेल्या प्राेटाेकाॅलचे उल्लंघन केले अाहे. हा अामच्या देशात माेठा गुन्हा अाहे. त्यामुळे इतरांच्या अाराेग्याला माेठा धाेका निर्माण हाेऊ शकताे. हेच लक्षात घेऊन अाम्ही या संघाला देश साेडण्याचे सांगितले अाहे, अशी प्रतिक्रिया मालदीवचे क्रीडामंत्री अहमद महलूफ यांनी दिली. अशा गैरवर्तन करणाऱ्यावर स्थानिकांवरही कडक कारवाई केली जात अाहे. याशिवाय विदेशी नागरिकांनाही सुचना देण्यात अाल्या अाहेत. यातूनच अाता बंगळुरू टीमवर कारवाई करण्यात अाली. यामुळे अाता या टीमवर देश साेडून जाण्याची नामुष्की अाेढावली.

प्रवासबंदी असतानाही एन्ट्री; एरिकचे गैरवर्तन महागात
काेराेना महामारीमुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने मालदीव येथे प्रवासबंदी करण्यात अाली. असा नियम असतानाही मालदीव सरकारने खास परवानगीतून भारताच्या बंगळुरू फुटबाॅल क्लबला स्पर्धेत सहभागी करून घेतले. गाइडलाइननुसार काेणत्याही खेळाडूला हाॅटेलच्या बाहेर पडता येणार नाही. मात्र, स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार बंगळुरू एफसीचा मिडफील्डर एरीक हा बाहेर फिरताना अाढळून अाला.

बागानचे दाेघे पाॅझिटिव्ह
मालदीवमध्ये १४ मे राेजी ड गटात बंगळुरू व माेहन बागान सामना हाेणार हाेता. मात्र, बागान क्लबचे प्रबीर दास व साहील हे दाेघे जण रविवारी काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे समाेर अाले अाहे.

बातम्या आणखी आहेत...