आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएशियन चॅम्पियनशिपमधील पदकविजेता २० वर्षीय मल्ल नवीन यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकातून आपले पदार्पण अविस्मरणीय करू शकताे. यासाठीची प्रचंड क्षमता या मल्लामध्ये आहे. त्याला एशियन स्पर्धेतील सर्वाेत्तम कामगिरीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघातील आपला प्रवेश निश्चित करता आला. प्रचंड उत्साह आणि जिद्दीतून ताे ७४ किलाे वजन गटात पदकाचे स्वप्न सत्यात उतरवू शकताे, असा विश्वास २०१८ राष्ट्रकुल चॅम्पियन मल्ल राहुल आवारेने दैनिक दिव्य मराठीशी बाेलताना व्यक्त केला. यादरम्यान भारतीय संघातील ऑलिम्पियन बजरंग, दीपक पुनियासह ऑलिम्पियन साक्षी मलिक, अंशू आणि विनेश फाेगट पदकासाठी सर्वाेत्तम कामगिरी करू शकतात, असेही ताे म्हणाला.
भारताकडून स्पर्धेमध्ये १२ मल्लांना संधी दिली आहे. यामध्ये प्रत्येकी सहा पुरुष आणि महिला मल्लांचा समावेश आहे. भारताचे हे मल्ल शुक्रवारपासून पदकासाठी मॅटवर उतरणार आहेत.
-काेराेनानंतर मल्ल कसे कमबॅक करत आहेत, कसे डावपेच ?
कोरोना महामारीने जगभरातील क्रीडा स्पर्धां आणि इव्हेंटला ब्रेक लावला. मात्र, कुस्तीपटू यादरम्यान थांबले नाहीत. त्यांनी आपापल्या परीने आखाडा वा घरीच आपला नित्याचा सराव कायम ठेवला. त्यामुळे त्यांना आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची माेठी संधीही मिळाली. यातून सर्वांनी आपल्यातील दुबळ्या बाजू दूर करण्यासाठी खास मेेहनत घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक तंत्रशुद्ध टिप्सही आत्मसात केल्या आहेत.
-यंदा पदकाचे काेण आहेत दावेदार ?
भारताचा मजबूत संघ सहभागी झाला आहे. त्यामुळे या सर्वांकडून पदकाची माेठी आशा आहे. यामध्ये खासकरून एशियन स्पर्धेतील पदकविजेत्या नवीनचा दावा अधिक मजबूत आहे. ताे पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी हाेत आहे. त्याची शैली चांगली आहे. यामुळे ७४ किलाे गटात त्याचे पदक निश्चित आहे.
-भारतासमाेर काेणत्या संघाचे आव्हान असेल?
भारतीय मल्लांनी दाेन वर्षांच्या ब्रेकमध्ये कसून मेहनत केली. त्यामुळे त्यांना आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावता आला. यातून त्यांना बलाढ्य मल्लांना चीतपट करण्याचे डावपेचही फत्ते करता आले. याचाच प्रत्यय एशियन चॅम्पियनशिपमध्ये आला. आता भारतीय मल्लांना इंग्लंड, कॅनडा व पाकच्या आव्हानाला सामाेरे जावे लागणार आहे. यातही हे सर्व जण विजयाचे मानकरी ठरतील.
-महिला गटात काेण ठरणार पदकाचे मानकरी?
यंदाच्या स्पर्धेत भारतीय महिलांसाठी पदकाची वाट काही प्रमाणात खडतर आहे. मात्र तरीही सर्वाेत्तम डावाचा अनुभव असलेल्या विनेश फाेगट (५३ कि.) , साक्षी मलिक (६२ कि) आणि अंशू (५७ कि.) सारख्या मल्लांकडून पदकाची माेठी आशा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.