आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Malojiraje Chhatrapati's A.B. Selection As Committee Member Of Football Federation

निवड:मालोजीराजे छत्रपतींची अ.भा. फुटबॅाल महासंघाच्या समिती सदस्यपदी निवड

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालोजीराजे छत्रपती यांची अखिल भारतीय फुटबॅाल महासंघाच्या कार्यकारी समिती सदस्यपदी निवड तर अखिल भारतीय फुटबॅाल महासंघाच्या अध्यक्षपदी माजी. खेळाडू कल्याण चौबे, उपाध्यक्षपदी एन. ए. हॅरिस व खजिनदारपदी अजय किपा यांची निवड झाली. ही निवड २ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये झाली. मालोजीराजेंनी वेस्टर्न इंडियन फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाचेही काम संभाळले आहे. या निवडीनंतर मालोजीराजे म्हणाले, एक नवी ऊर्जा घेऊन अखिल भारतीय फुटबॅाल महासंघ पुढील काळात काम करेल. भारतीय फुटबॉल महासंघ खेळाडूंना आवश्यक त्या सोयीसुविधा, संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काम करण्यास मी कटिबद्ध असेन. महाराष्ट्रातील इतर भागातही फुटबॉल खेळाचे महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील खेळाडूंना आवश्यक ते खेळाचे सर्व साहित्य उपलब्ध करून देणार आहे.

मालोजीराजेंच्या निवडीने कोल्हापूरच्या खेळाडूमध्ये नवीन चैतन्य संचारेल. त्यांची निवड ही कोल्हापूरकरांच्या दृष्टीने अभिमानाची बाब राहील. त्यांनी गेली अनेक वर्षे फुटबॉल खेळाडूंना आवश्यक त्या पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, इतर स्पर्धांसाठी ही मदत केली. याचबरोबर मालोजीराजेंनी खेळाबरोबर शिक्षण क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...