आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात माेठ्या फुटबाॅल लीगच्या टाॅप-८ संघांच्या सामन्यांचा थरार आता मंगळवारपासून रंगणार आहे. आजपासून चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात हाेत आहे. यादरम्यान पहिल्याच दिवशी इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटी आणि बायर्न म्युनिच संघ समाेरासमाेर असणार आहेत. याचदरम्यान पाेर्तुगालच्या बेनफिका क्लबला इटालियन क्लब इंटर मिलानच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
बेनफिकाचा विजयाचा दावा मजबूत; मिलान महिनाभरापासून अपयशी
लिस्बनच्या स्टेडियम आॅफ लाइटवर बेनफिका व इंटर मिलान झुंजणार आहेत. पाेर्तुगालच्या क्लबचा विजयाचा दावा मजबूत मानला जात आहे. कारण, इटलीच्या क्लबला महिनाभरात सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे मिलान क्लबला विजयासाठी माेठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.