आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉल:मँचेस्टर युनायटेड दुसऱ्यांदा ९-० ने विजयी, सर्वात मोठ्या विजयाशी बरोबरी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रीमियर लीग : मँचेस्टर युनायटेडने घरच्या मैदानावर साउथम्प्टनला हरवले

मँचेस्टर| इंग्लंडचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीगमध्ये सर्वात मोठ्या विजयाशी बरोबरी केली. मँचेस्टर युनायटेडने घरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर साउथम्प्टनला ९-० ने हरवले. साउथम्प्टनच्या दोन खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आले होते. एरोन वेन बिसाका, मार्कस रेशफोर्ड, एडिनसन कवानी, अँथोनी मार्शल, स्कॉट मॅक्टॉमिने, ब्रुरो फर्नांडिस, डॅनियल जेम्सने गोल केला. साउथम्प्टनच्या जेन बेडनेरेकने आत्मघाती गोल केला. युनायटेडने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली. यापूर्वी, १९९५ मध्ये इप्सविचला ९-० ने मात दिली. या लीगमध्ये कुठल्याही संघाचा घरच्या मैदानावरील हा सर्वात मोठा पराभव ठरला. युनायटेड २२ सामन्यांत १३ विजयांनंतर ४४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मँचेस्टर सिटी (४४) पहिल्या व लिव्हरपूल (४०) तिसऱ्या स्थानी आहे.

बातम्या आणखी आहेत...