आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Manika Batra Makes History: First Indian Woman To Win Bronze Medal In Asian Table Tennis Championship

मनिका बत्राने रचला इतिहास:आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय पॅडलर मनिका बत्राने इतिहास रचला आहे. 27 वर्षीय मनिकाने आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

शनिवारी सकाळी चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीतील सामना हरल्यानंतर मनिकाने कांस्यपदकाच्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि देशाला पदक मिळवून दिले.

बँकॉकमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मनिकाने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेली आणि तीन वेळा आशियाई चषक विजेती हिना हयातचा 4-2 असा पराभव केला.

तत्पूर्वी, तिला उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित जपानी खेळाडू मीमा इटोकडून 8-11, 11-7 7-11, 6-11, 11-8 7-11 (2-4) असा पराभव पत्करावा लागला होता.

उपांत्यपूर्व फेरीत चिनी तैपेईच्या सु-यूचा 4-3 असा केला होता पराभव.

भारतीय स्टारने एक दिवस आधी शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चेन सु-यूचा 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेत टॉप-4 मध्ये पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.

जागतिक क्रमवारीत 7 क्रमांकावर असलेल्या चेन जिंगटोनला केले बाहेर

जागतिक क्रमवारीत 44 व्या क्रमांकावर असलेल्या मनिका बत्राने महिला एकेरीत अनेक उलटफेर केले. तिने सुरुवातीच्या फेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील चिनी खेळाडू चेन जिंगटोंगला बाहेरचा रस्ता दाखवला.

मनिका बत्राने राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक मिळवले आहे.
मनिका बत्राने राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक मिळवले आहे.
बातम्या आणखी आहेत...