आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maradona's Jersey Set An Unparalleled Record, The Highest grossing Item At Auction; He Wore The Jersey In 1986 And Scored The 'Hand Of God Goal'.

मॅराडोनाच्या जर्सीचा रेकॉर्ड ब्रेक लिलाव:जर्सी ठरली सर्वाधिक कमाई करणारी वस्तू; 1986 मध्ये ही जर्सी घालून मॅराडोनाने केला होता 'हँड ऑफ गॉड गोल'

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंपैकी एक असलेल्या डिएगो मॅराडोनाने 1986 च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत परिधान केलेल्या जर्सीला लिलावात 67.58 कोटी रुपये (£7.1 मिलियन) मिळाले. आता तो लिलावामध्ये सर्वाधिक रक्कम मिळवणारी वस्तू ठरली आहे.

जर्सीशी जोडला गेला आहे वाद

या सामन्यात मॅराडोनासोबत वादही झाला आणि तो 'हँड ऑफ गॉड गोल' म्हणूनओळखला जातो. खरे तर या सामन्यात मॅराडोनाच्या एका गोलवरून वाद झाला होता. मॅराडोनाला हेडरने गोल करायचा होता, पण चेंडू त्याच्या हाताला लागला आणि गोलपोस्टमध्ये गेला आणि मॅच रेफ्रींना तो दिसला नाही आणि त्यांनी तो गोल दिला. या सामन्यात मॅराडोनाने आपल्या शानदार ड्रिब्लिंगच्या जोरावर इंग्लंडच्या संपूर्ण संघाला चुकवून गोल करुन संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. 22 जून 1986 रोजी मेक्सिको सिटीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याला आणखी एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे, कारण चार वर्षांपूर्वीच ब्रिटन आणि अर्जेंटिना यांच्यात फॉकलंड बेटा वरुन संघर्ष झाला होता.

मॅराडोनामुळे अर्जेंटिना 1986 च्या फिफा विश्वचषकाचा विजेता ठरला.
मॅराडोनामुळे अर्जेंटिना 1986 च्या फिफा विश्वचषकाचा विजेता ठरला.

2002 मध्ये,मॅराडोनाच्या दुसऱ्या गोलला निवडले शतकातील सर्वोत्तम गोल

या सामन्यातील मॅराडोनाने केलेल्या दुसऱ्या गोलला 2002 मध्ये फिफाने शतकातील सर्वोत्तम गोल म्हणून निवडले. त्यावेळी, मॅरडोनाने वादग्रस्त गोलबद्दल सांगितले की, हा गोल मॅराडोनाचे डोके आणि देवाच्या हाताच्या संमिश्रणाने झाला. या सामन्यात अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1ने पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. त्यानंतर अर्जेंटिनाने फायनल जिंकून फिफा वर्ल्डकप चॅपियनशिप पटकावले

मॅराडोनाने विरोधी खेळाडूसोबत बदलली होती जर्सी

या सामन्यानंतर मॅराडोनाने इंग्लंडचा मिडफिल्डर स्टीव्ह हॉजसोबत जर्सीची अदलाबदल केली होती. आजपर्यंत त्याने ते कधीच विकले नाही, ते गेल्या 20 वर्षांपासून मँचेस्टरमधील इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संग्रहालयात आहे.

बातम्या आणखी आहेत...