आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Marekke Created History By Giving Five Defenders A Chance; A One sided Win Against Portugal

दिव्य मराठी विशेष:पाच डिफेंडरला संधी देत माेराेक्काेने रचला इतिहास ; पाेर्तुगालविरुद्ध एकतर्फी विजय

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोराेक्काे संघाने बलाढ्य पाेर्तुगाल टीमविरुद्ध सरस असे डावपेच आखले. यासाठी संघाने पाच डिफेंडरला संधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यातूनच टीमला पाेर्तुगालविरुद्ध एकतर्फी विजय साजरा करत वर्ल्डकपच्या उपांत्य फेरी गाठण्याचा इतिहास रचता आला. टीमने दमदार सुरुवात करताना शेवटच्या मिनिटापर्यंत सावध खेळी केली. यादरम्यान टीमने पूर्णपणे डिफेन्सवर अधिक भर दिला. त्यामुळे पाेर्तुगाल संघातील फाॅर्मात असलेल्या रामाेससह राेनाल्डाे आणि पेपे, कोस्टा, फेलिक्ससारख्या खेळाडूंना आफ्रिकन माेराेक्काे संघाच्या डिफेन्सला भेदता आले नाही. याशिवाय नेसरीने पहिल्या हाफमध्येच पाेर्तुगाल टीमच्या डिफेन्सला भेदले. यासह माेराेक्काेने आघाडी घेतली. त्यानंतर टीमने हीच आघाडी कायम ठेवताना आपला विजय साकारला. आता टीमची नजर पहिल्यांदा फायनल गाठण्यावर लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...