आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maria Sakkari's Winning Hat trick: Beat Ons Jebur; Sakkari In The Semi finals In 68 Minutes

टेनिस:मारिया सक्कारीची विजयी हॅट‌्ट्रिक: ओंस जेबूरवर मात ; सक्कारी 68 मिनिटांत उपांत्य फेरीत

फाेर्ट वर्थएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाचव्या मानांकित मारिया सक्कारीने आपला दबदबा कायम ठेवताना महिलांच्या डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धेत विजयी हॅट‌्ट्रिक साजरी केली. तिने महिला एकेरीच्या तिसऱ्या सामन्यामध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या आेन्स जेबूरला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. तिने ६-२, ६-३ ने सामना जिंकला. यासाठी तिला ६८ मिनिटे शर्थीची झंुज द्यावी लागली. मात्र, तिने आक्रमक सर्व्हिस करत ट्युनिशियाच्या जेबूरवर मात केली. तिला जेबूरविरुद्ध आतापर्यंतचा दुसरा व यंदाच्या सत्रातील पहिला विजय साजरा करता आला. यापूर्वी सक्कारीने २०२० मध्ये ट्युनिशियाच्या टेनिसपटूला पराभूत केले हाेते. दुसरीकडे आर्यना सबालेंकाने एकेरीच्या सामन्यात अमेरिकन टेनिसपटू जेसिका पेगुलाचा ६-३, ७-५ ने पराभव केला. यासह तिने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला.

बातम्या आणखी आहेत...