आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mary Kom Knocked Out Of Tokyo Olympics, Indian Boxer In Tears After 3 2 Split Decision Loss; News And Live Updates

मेरी कोमचे भंगले स्वप्न:प्री-क्वार्टर फायनलमध्ये 3 पैकी 2 फेऱ्या जिंकून ही पराभूत झाली मेरी कोम; कोलंबियन बॉक्सरचा यापूर्वी दोनदा केला होता पराभव

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकूण तीन फेऱ्यानंतर 5 पैकी 3 न्यायाधीशांनी व्हॅलेन्सीयाला विजयी घोषित केले

कोरोना महामारीच्या सावटाखाली टोकियो ऑलिम्पिक 2021 सुरुवात झाली आहे. बॉक्सिंगमध्ये भारताला नुकताच मोठा झटका बसला आहे. महान बॉक्सर मेरी कोम कोलंबियाच्या व्हिक्टोरिया इंग्रीट वॅलेन्सीयाकडून पराभूत झाली आहे. कोलंबियन बॉक्सरने मेरी कोमचा 3-2 ने असा पराभव केला.

मेरी कोम भावनिक झाल्यानंतर कोलंबियन बॉक्सरने तीला मिठी मारली.
मेरी कोम भावनिक झाल्यानंतर कोलंबियन बॉक्सरने तीला मिठी मारली.

पहिल्या फेरीत 5 पैकी 4 न्यायाधीशांनी व्हॅलेन्सीयाच्या बाजूने निकाल दिला व हाच निकाल या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतरच्या फेरीत मेरी कोमने दोन बाउट्स जिंकल्या पण हे सामना जिंकण्यासाठी पुरेसे नव्हते. त्यामुळे मेरी कोमसह भारताचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.

पराभवानंतर न्यायाधीशांना मान देणारी भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम.
पराभवानंतर न्यायाधीशांना मान देणारी भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम.

मेरी कोमने कोलंबियन बॉक्सरचा यापूर्वी दोनदा केला होता पराभव
विशेष म्हणजे भारतीय महान बॉक्सर मेरी कोमने यापूर्वी कोलंबियन बॉक्सरचा दोन वेळा पराभव केला होता. परंतु, यावेळी 32 वर्षीय व्हॅलेन्सीयाने 38 वर्षीय मेरी कोमवर मात केली. परंतु, रेफरीने जेंव्हा व्हॅलेन्सीयाचे हात वर केले तेंव्हा मेरी कोमच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यानंतर व्हॅलेन्सीयाने मेरी कोमला मिठी मारली आणि तीचे सांत्वन केले.

विजयानंतर व्हॅलेंसियाने मेरी कोमला अशा प्रकारे आदर दिला.
विजयानंतर व्हॅलेंसियाने मेरी कोमला अशा प्रकारे आदर दिला.

बाउट्स फॅक्ट्स

  • पहिल्या फेरीत 5 पैकी 4 न्यायाधीशांनी व्हॅलेन्सियाला 10-10 गुण दिले. त्याच वेळी एका न्यायाधीशाने 9 गुण दिले. तर मेरी कोम यांना 4 न्यायाधीशांनी 9 गुण दिले आणि एका न्यायाधीशाने 10 गुण दिले.
  • 38 वर्षीय मेरी कोमने पहिला बाउट्स गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले आणि दुसरा बाउट्स जिंकला.
  • दुसर्‍या फेरीत व्हॅलेन्सियाला 5 पैकी 2 न्यायाधीशांनी 10-10 गुण दिले. तर 2 न्यायाधीशांनी 9-9 गुण दिले. दुसरी फेरी मेरी कोमने जिंकली. मेरी कोमला 3 न्यायाधीशांकडून 10-10 गुण दिले आणि 2 न्यायाधीशांकडून 9-9 गुण मिळाले.
  • तिसरी फेरीही मेरी कोमच्या नावावर राहिली. मेरी कोमला 3 न्यायाधीशांनी 10-10 गुण दिले. त्याचवेळी 2 न्यायाधीशांनी 9-9 गुण दिले. व्हॅलेन्सियाला 2 न्यायाधीशांनी 10-10 गुण दिले. तर 3 न्यायाधीशांकडून त्याला 9-9 गुण मिळाले.
  • दुसर्‍या व तिसर्‍या फेरीत भारतीय बॉक्सरने योग्य हुकचा चांगला वापर केला. एकूण तीन फेऱ्यानंतर 5 पैकी 3 न्यायाधीशांनी व्हॅलेन्सीयाला विजयी घोषित केले. यावेळी केवळ 2 न्यायाधीशांनी मेरी कोमच्या बाजूने निर्णय दिला.
बातम्या आणखी आहेत...