आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाच्या कुचकामी धाेरणामुळे स्वस्त आणि दर्जाहीन साहित्याशीही स्नेह जुळवत औरंगाबाद क्रीडा प्रबाेधिनीतील स्नेहा मदनेने सुवर्ण उडी घेतली. स्वस्तातील ९०० रुपयांचे शूज घालून तिने गुरुवारी पुण्यात महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या तिहेरी उडीत महिलांच्या गटात ११.५० मीटर उडी घेत विजेतेपद मिळवले. यासह ज्युनियर गटातील नॅशनल चॅम्पियन स्नेहा सुवर्णची मानकरी ठरली. तिने आपली सहकारी कल्पना मडकारीला मागे टाकले. कल्पनाने ११.२९ मीटर उडी घेत राैप्यपदक पटकावले.
टेक्निकल बाजू
{ अॅप्राेच रनला ब्रेक लागताे.
{ फाऊलचा धाेका वाढताे.
{ गंभीर इन्ज्युरीचा धाेका.
{ कामगिरीचा दर्जा घसरताे.
{ न्यूनंगडाची भावना वाढते.
दर्जेदार साहित्य गरजेचे : डाॅ. कांबळे
^गुणवत्तेबराेबरच खेळाडूंच्या यशात दर्जेदार क्रीडा साहित्याची भूमिका महत्त्वाची असते. साहित्याच्या आधारे त्यांना यशाेशिखर गाठता येते. दर्जाहीन व स्वस्तातील साहित्याचा कामगिरीवर विपरीत परिणाम होताे. त्यामुळे टेक्निकली या साहित्याची भूमिका प्रभावी ठरते.
डाॅ. दयानंद कांबळे, प्र. क्रीडा संचालक,औरंगाबाद
प्रबाेधिनीकडून दर्जाहीन साहित्य
औरंगाबाद क्रीडा प्रबाेधिनीत धावपटूंना दर्जाहीन व स्वस्तातील क्रीडा साहित्य पुरवले जाते. मात्र, खेळाडू मेहनतीतून यश संपादन करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.