आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Match Winner On The Field Due To Fitness! England's Anderson International 950+ Wickets

चाळिशीतही युवांसारखा प्रचंड उत्साह:फिटनेसमुळे मैदानावरही मॅचविनर! इंग्लंडचा अँडरसन आंतरराष्ट्रीय 950+ बळी

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या चाळिशीत थांबण्याचा अनेक क्रिकेटपटू विचार करतात आणि थेट निवृत्तीची घाेषणा करताना दिसतात. मात्र, याच वयात इंग्लंडचा वेगवान गाेलंदाज अँडरसन धारदार गाेलंदाजीतून सामने गाजवत आहे. त्याच्या नावे विक्रमी कामगिरीची नाेंद झाली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५० पेक्षा अधिक बळीचा विक्रम आपल्या नावे नाेंदवला.

अ‍ॅंडरसन -वय : 40 | खेळ : क्रिकेट इंग्लंडच्या वेगवान गाेलंदाज जेम्स अँडरसनच्या सामन्यागणिक विकेट आहे. त्याने आंतरराष्ट्रीय ९५०+ बळी घेतले आहेत. ही कामगिरी करणारा ताे एकमेव वेगवान गाेलंदाज आहे. याच वयात यापूर्वी १९३५ मध्ये इंग्लंडच्या मॅरिस व १९४८ मध्ये गब्बी एलनची कामगिरी लक्षवेधी ठरली हाेती.

टायगर वुड्स -वय : 46 | खेळ : गोल्फ अमेरिकन गाेल्फपटू टायगर वुड्सने २०१९ मध्ये शेवटचा मेजर किताब जिंकला हाेता. यादरम्यान त्याचे वय ४३ वर्षे हाेते. ताे मास्टर्स स्पर्धेत पाच, पीजीए चॅम्पियनशिपमध्ये ४, यूएस ओपन व द ओपन चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येकी ३ वेळा किताब विजेता ठरला.

टॉम ब्रॅडी -वय : 45 | खेळ : अमेरिकन फुटबॉल अमेरिकन फुटबाॅलपटू टाॅम ब्रॅडीने वयाच्या चाळिशीतही दाेन सुपर बाऊल जिंकले आहेत. त्याने वयाच्या ४१ व्या वर्षात २०१९ मध्ये इंग्लंड पॅट्रियट्ससाेबत सहा वेळा रिंग जिंकली. तसेच ताे ४३ व्या वर्षी सर्वाेत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला हाेता.

फर्नांडाे अलाेन्साे -वय : 41 |खेळ : एफ-१ दाेन वेळच्या एफ-वन चॅम्पियन फर्नांडाे अलाेन्साेने २०२१ मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी पुन्हा एकदा पाेडियम गाठले. त्याने २०२२ च्या सत्रात १३ पैकी ९ रेसमध्ये स्पॅनियार्ड गुणांची कमाई केली आहे. ताे आता २०२३ मध्ये एस्टन मार्टिन संघाकडून रेसमध्ये सहभागी हाेणार आहे.

जियानलुईजी बुफाेन -वय : 44 | खेळ : फुटबॉल इटलीच्या या गाेलरक्षकाने २००६ मध्ये इटलीत विश्वचषक जिंकला. यातून त्याच्या नावे ११ लीग किताबाची नाेंद झाली आहे. ताे आता ४४ व्या वर्षीही परमा क्लबकडून सिरी बी फुटबाॅल स्पर्धेत खेळत आहे. २०१८ मध्ये वयाच्या चाळिशीत त्याने युवेंट्स क्लबसाेबत दाेन सिरी एचे विजेतेपद पटकावले आहे.

बातम्या आणखी आहेत...