आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेडबुलच्या फॉर्म्युला वन ड्रायव्हर मॅक्स वर्सटापेनसाठी मियामी इंटरनॅशनल ऑटाेड्रम सर्किटवर तिसऱ्या स्थानावरून सुरुवात करताना मियामी ग्रांप्री चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. तो पहिल्यांदाच या रेसमध्ये चॅम्पियन ठरला. त्याने पोल पोझिशनवरून सुरुवात करणाऱ्या फरारीच्या चार्ल्स लेकलेर्कला मागे टाकले.
मॅक्सने करिअरमध्ये ६३ वेळा पोडियम फिनिशची कामगिरी नोंद केली. याशिवाय तो सर्वाधिक वेळा पोडियम फिनिश करणाऱ्या खेळाडूंच्या टॉप-१० मध्ये दाखल झाला आहे. तो या यादीत दहाव्या स्थानी आहे. यात अव्वलस्थानी लुईस हॅमिल्टन आहे. त्याच्या नावे विक्रमी १८३ वेळा पोडियम फिनिश करण्याची कामगिरी नोंद आहे. मॅक्सने ३०८.३२६ किमी ही रेस १ तास ३४ मिनिटे २४.२५८ सेकंदांत जिंकली. यादरम्यान पोल पोझिशनवरून रेसला सुरुवात करणारा लेकलेर्क हा दुसऱ्या स्थानी राहिला. फेरारीच्या कार्लोसने तिसरे स्थान गाठले. सात वेळचा चॅम्पियन हॅमिल्टन सहाव्या स्थानी राहिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.