आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Max Verstappen Became The Champion For The Second Time From The Pole Position

कॅनडा ग्रांप्री:मॅक्स वर्सटापेन दुसऱ्यांदा पोल पोझिशनवरून ठरला चॅम्पियन

माँट्रियल7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेड बुलचा ड्रायव्हर मॅक्स वर्सटापेन हा कॅनडा ग्रांप्री फॉर्म्युला वन रेसमध्ये चॅम्पियन ठरला. त्याने करिअरमध्ये पहिल्यांदाच या रेसचा किताब जिंकण्याचा बहुमान पटकावला. यासह त्याने यंदाच्या सत्रामध्ये किताबाचा षटाकर मारला. त्याचे हे सत्रातील सहावे विजेतेपद ठरले. पोल पोझिशनवरून सुरुवात करणाऱ्या २४ वर्षीय मॅक्सने मॉट्रियलच्या सर्किट गाइल्स विलेन्यूवेवर ७० लॅपची ३०५.२७ किमीची ही रेस १ तास ३६ मिनिटे २१.७५ सेकंदांत पूर्ण केली. त्याने कार्लोसवर अवघ्या ०.९९३ सेकंदांच्या आघाडीने किताबावर नाव काेरले. मर्सिडिझचा लुईस हॅमिल्टन हा तिसऱ्या स्थानावर राहिला. मॅक्सने सत्रात ९ पैकी सहावी रेस जिंकली. त्याने आपल्या करिअरमध्ये २६ व्या विजयाची नोंद केली. त्याच्या नावे आता १७५ गुणांची नोंद झाली आहे. मॅक्सने यंदाच्या सत्रात दुसऱ्यांदा पोल पाेझिशनवरून सुरुवात करत चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला.

बातम्या आणखी आहेत...