आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mayuri's Hat trick Of Medals On Debut; Ritika Sriram, Kamal, Raheela Suvarna

नॅशनल गेम्स:मयूरीची पदार्पणातच पदकांची हॅॅट््ट्रिक; ऋतिका श्रीराम, काेमल, राहीला सुवर्ण

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट मयूरी लुटेने पदार्पणात नॅशनल गेम्समध्ये पदकांची हॅट््ट्रिक साजरी केली. तिने साेमवारी स्पर्धेत महाराष्ट्र संघाला स्प्रिंट प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकून दिले. यासह तिच्या नावे तिसऱ्या पदकाची नाेंद झाली. तसेच अहमदनगरच्या वेटलिफ्टर काेमल वाकळे (८७ कि.), साेलापूरच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ऋतिका श्रीराम आणि जिम्नॅस्ट राहीने स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. यासह त्यांनी महाराष्ट्र संघाची साेनेरी यशाची कामगिरी कायम ठेवली. यादरम्यान महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच जलतरणात महाराष्ट्राच्या महिला संघाने आणखी एक रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या महिला संघाने चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. महाराष्ट्र संघाकडून पलक जोशी, ज्योती पाटील, प्रतिष्ठा डांगी व अवंतिका चव्हाण यांनी या शर्यतीत प्रतिनिधित्व केले होते.

अहमदनगरची काेमल ८७ किलाे वजन गटात चॅम्पियन ऋतिका श्रीराम ठरली चॅम्पियन महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीराम हिने महिलांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि खऱ्या अर्थाने ‘जलपरी’चा मान मिळवला.

ईशाला कांस्य : महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिने कांस्य पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. सोलापूरच्या या खेळाडूने आतापर्यंत शालेय राष्ट्रीय, सबज्युनियर व ज्युनियर गटात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली

जिम्नॅस्टिक्स : राही अव्वल; सिद्धीला कांस्य: जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे. महिला गटात महाराष्ट्राच्या राही पखालेने सुवर्णपदक जिंकले तर सिद्धी ब्रीड हिने कांस्यपदक जिंकले.

ट्रम्पोलिन : आदर्श भोईरचे पहिले सुवर्ण ट्रम्पोलिन प्रकाराचा प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आलेला आहे. यात आदर्शने महाराष्ट्राच्या नावे पहिल्या सुववर्णपदकाची नाेंद केली.

महाराष्ट्र बॅडमिंटन संघाला कांस्यपदक चिराग,मालविकाची अपयशी खेळी महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघास उपांत्य फेरीत अग्रमानांकित तेलंगण संघाकडून अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महाराष्ट्र संघास कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्यपदक विजेत्या संघात चिराग शेट्टी, रितिका ठाकरे, वरुण कपूर, मालविका बनसोड, विप्लव कुवळे या खेळाडूंचा समावेश आहे. या संघास प्रशिक्षक अक्षय देवलकर व वरुण खानविलकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...