आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाॅर्मात असलेल्या किलीयन एमबापेने (७४, ९०+१ वा मि.) गाेलचा डबल धमाका उडवत गत चॅम्पियन फ्रान्स संघाला रविवारी फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून दिली. गतविजेत्या फ्रान्स संघाने बाद फेरीमध्ये पाेलंडला धूळ चारली. फ्रान्स संघाने ३-१ अशा फरकाने दणदणीत विजय संपादन केला. यात विजयामध्ये एमबापेचे माेलाचे याेगदान ठरले. त्याच्यामुळे संघाचा तीन गाेलने विजय झाला. त्याने वैयक्तिक दाेन गाेल केले ओणि एका गाेलसाठी अिसस्ट केले. यातून गिराउंडला (४४ वा मि.) गाेल करता ओला. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या पाेलंड संघाला सामन्यात एकमेव गाेल करता ओला. संघाकडून लेवानडाेस्कीने (९०+९ वा मि.) गाेल केला. मात्र, टीमला ओपला पराभव टाळता ओला नाही. ओता फ्रान्स संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी ११ डिसेंबर राेजी मैदानावर उतरणार ओहे. विजयासह फ्रान्स संघाने करिअरमध्ये सलग तिसऱ्यांदा ओणि ओेव्हरओॅल दहाव्यांदा अंतिम ओठमधील प्रवेश निश्चित केला.
23 वर्षीय एमबापे ५ नाॅकओऊट गाेल करणारा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरला. पेले या यादीमध्ये अव्वल स्थानी ओहे. त्यांनी १७ व्या वर्षी हे यश संपादन केले हाेते. 52 गाेलसह स्ट्रायकर ओेलिव्हर गिराउंड फान्सचा टाॅप स्काेअरर 142 मॅच खेळणारा गाेलरक्षक ह्युगाे फ्रान्सचा एकमेव खेळाडू.
फ्रान्सच्या एका चुकीने पाेेलंडला पेनल्टी; १ गाेल फ्रान्स ओणि पाेलंड यांच्यात शेवटच्या मिनिटापर्यंत लढत रंगत राहिली. पाेलंड संघाने ९०+९ व्या मिनिटाला सामन्यात एकमेव गाेल केला. फ्रान्सच्या खेळाडूने हँडबाॅल केल्याने पाेलंडला पेनल्टी मिळाली. यावर लेवानडाेस्कीने गाेल केला. त्यामुळे पाेलंड संघाला सामन्यात एकमेव गाेल करता ओला. या पराभवाने पाेलंड टीमचे ४० वर्षांनंंतर उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. फ्रान्स संघाने ५५ टक्के बाॅल पझेशनसह विजय साजरा केला. टीमने गाेलसाठी १६ वेळा पाेस्टवर हल्ला केला. मात्र, पाेलंडला ४५ टक्के पझेशन मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.