आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिलियन एमबापेचा गत चॅम्पियन फ्रान्स संघ आता फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी फ्रान्स संघाला आता पाेलंडच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हे दाेन्ही संघ रविवारी उपउपांत्यपूर्व सामन्यात समाेरासमाेर असतील. एमबापेचा फ्रान्स संघ मजबूत मानला जाताे. दुसरीकडे पाेलंड संघामध्ये ऐतिहासिक विजय संपादन करण्याची क्षमता आहे.
प्लेअर्स टू वॉच फ्रान्सचा फाॅरवर्ड ग्रीजमॅन फाॅर्मात आहे. त्याने संघाला ११ वेळा गाेल करण्याची संधी मिळवून दिली. तसेच त्याने यंदा एका गाेलसाठी असिस्टही केले आहे.
पाेलंड कोच फ्रान्स कोच { पाेलंडचे काेच चेस्वा मिखनियेविज याच्या मार्गदर्शनाखाली संघाला ३६ वर्षांनंतर बाद फेरी गाठता आली. आक्रमक खेळीवर भर. {दिदिएर देसचॅम्प्स हे २०१२ पासून फ्रान्सचे प्रशिक्षक आहेत. टीमची दर्जेदार कामगिरी नाेंद.
स्ट्रॅटेजी काॅर्नर : विनिंग फॉर्मेशन { गत दाेन सामन्यांत पाेलंड संघ ४-४-२ अशा फाॅर्मेशनने खेळला हाेता. आताही याच डावपेचासह उतरण्याच्या तयारीत आहे. {फ्रान्स संघाने ४-३-२-१ फॉर्मेशनने सुरुवातीचे दाेन सामने जिंकले. मात्र, ट्युनिशियाविरुद्ध टीमचा पराभव झाला हाेता.
फिफा वर्ल्डकपमध्ये {फ्रान्स आणि पाेलंड संघांत १९८२ मध्ये वर्ल्डकपचा सामना झाला. यात पाेलंडने ३-२ ने विजय मिळवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.