आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवसंजीवनी देण्यासाठी:एमसीसीचा वाढत्या लीगला विराेध

दुबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवसंजीवनी देण्यासाठी मेरिलबाेर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) प्रयत्नशील आहे. यासाठी एमसीसीने आता प्राेेफेशनल क्रिकेट लीगच्या आयाेजनाला विराेध दर्शवला आहे. या लीगच्या आयाेजनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट अडचणीमध्ये सापडल्याची खंत एमसीसीने व्यक्त केली. एमसीसीच्या वतीने दुबई येथे बैठकीचे आयाेजन करण्यात आले. या बैठकीमध्ये वाढत्या लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या घसरणीवर चर्चा झाली. लीगची संख्या वाढत असलेल्या आयसीसीसाेबत संलग्न असलेल्या देशांच्या खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत सहभागी हाेता येत नाही. कारण, या लीगमुळे दाैऱ्यात कपात झाली, असेही एमसीसीने स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...