आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Medal Hat trick On The Same Day In Tokiyo Paraolympics News And Live Updates

पॅरालिम्पिक:एकाच दिवशी मेडल हॅट्ट्रिक; पॅडलर भाविनाबेन, हाय जम्पर निषादला रौप्य; विनोदला कांस्य

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत भारतीय संघाला पदक

भारताच्या सुपरस्टार युवा खेळाडूंनी टाेकियाे पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकाचा बहुमान मिळवून राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लाेषात साजरा केला. भारताने पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धेत एकाच दिवशी पदकाची हॅट््ट्रिक साजरी केली. भारताला एकाच दिवशी टाेकियाे पॅरालिम्पिक स्पर्धेत दाेन राैप्यसह एक कांस्यपदक मिळाले. टेबल टेनिसपटू भाविनाबेन आणि हाय जम्पर निषाद कुमारने प्रत्येकी एक राैप्य, थाळीफेकपटू विनाेद कुमारने कांस्यपदकाची कमाई केली.

पॅरालिम्पिकमध्येही आता महिला खेळाडूनेच उघडले पदकाचे खाते
भारताची टेबल टेनिसपटू भाविनाबेनने महिला एकेरीच्या क्लास-४ मध्ये राैप्य जिंकले. तिला फायनलमध्ये जगातील नंबर वन यिंगविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या यिंगने ११-७, ११-५, ११-६ ने सामना जिंकून सुवर्णपदक आपल्या नावे केले. यादरम्यान पराभवाने भारताची भाविनाबेन राैप्यपदकाची मानकरी ठरली. यासह आता पॅरालिम्पिकमध्येही महिला खेळाडूनेच भारताला पदकाचे खाते उघडून दिले. यापूर्वी टाेकियाे ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला राैप्यपदकाने दमदार सुरुवात करून दिली हाेती.

पॅरालिम्पिकमध्येही आता महिला खेळाडूनेच उघडले पदकाचे खाते
पॅरालिम्पिकमध्येही आता महिला खेळाडूनेच उघडले पदकाचे खाते

थाळीफेकमध्ये ३७ वर्षांनंतर भारताला पदक; दुसरेही कांस्य
भारतीय भारताच्या विनाेद कुमारने थाळीफेक एफ-५२ इव्हेंटमध्ये कांस्यपदक पटकावले. त्याने १९.९१ मीटर थाळीफेक केली. यासह त्याच्या नावे नव्या एशियन विक्रमाची नाेंद झाली. ही त्याच्या करिअमरधील सर्वाेत्तम कामगिरी ठरली. त्याला पदक जिंकण्याचे स्वप्न यशस्वीपणे साकारता अाले. यासह भारताने थाळीफेक प्रकारात ३७ वर्षांनंतर पॅरालिम्पिकचे पदक जिंकले. यापूर्वी जाेंगिदर सिंग बेदी यांनी १९८४ मध्ये याच गटात कांस्यपदकाचा बहुमान पटकावला हाेता. आता पाेलंडच्या पियाेत्रने सुवर्ण आणि क्राेएशियाच्या वेलिमिरने राैप्यपदक जिंकले.

थाळीफेकमध्ये ३७ वर्षांनंतर भारताला पदक; दुसरेही कांस्य
थाळीफेकमध्ये ३७ वर्षांनंतर भारताला पदक; दुसरेही कांस्य

तिसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत भारतीय संघाला पदक
हिमाचल प्रदेशच्या २१ वर्षीय निषादने पुरुषांच्या उंच उडी टी-४७ इव्हेंटमध्ये राैप्य पटकावले. त्याने २.०६ मीटर उंच उडीत मारून एशियन विक्रमाची नाेंद केली. या गटात भारताचा राम पाल पाचव्या स्थानी राहिला. त्याने १.९४ मीटरची उडी मारली. अमेरिकेच्या राॅडरिकने २.१५ मीटरची उडी मारून सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. भारताने तिसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडीच्या इव्हेंटमध्ये पदक पटकावले. भारताचे उंच उडीतील हे चाैथे पॅरालिम्पिक पदक ठरले. यापूर्वी २०१२ लंडनमध्ये गिरीषाने राैप्य, २०१६ रियाेत थंगावेलूने सुवर्ण व वरुण ने राैप्य पटकावले हाेते.

बातम्या आणखी आहेत...