आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्सिलोनातून 21 वर्षांनंतर असा निरोप...:मेसी रडत म्हणाला, 50% वेतन घटवण्याची ऑफरही दिली, पण क्लबने ऐकले नाही

बार्सिलोना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील उत्कृष्ट फुटबॉलपटू लियोनेल मेसीच्या डोळ्यांतील अश्रूंचे हे चित्र त्याच्या कोट्यवधी चाहत्यांनाही रडवून गेले. या स्टार फुटबॉलरने स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना सोडला. मेसी वयाच्या १३ व्या वर्षीपासूनच या क्लबशी जोडला गेला. २१ वर्षांपासून याच क्लबकडून खेळत होता.

असाही दिवस येईल याचा मी कधीच विचार केला नव्हता. मी ५० % वेतन कमी करण्याची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी काहीही ऐकले नाही. - लियोनेल मेसी (रविवारी माध्यमांशी बोलताना म्हणाला)

...मग का सोडावा लागला क्लब?
बार्सिलोना क्लब मोठ्या आर्थिक संकटात आहे. सुमारे ८ हजार कोटी रु. कर्ज आहे. २०१७ मध्ये मेसीचा क्लबशी शेवटचा करार ~४९०० कोटींचा होता. त्यामुळे या क्लबसोबत मेसीचा नवा करार होऊ शकला नाही. सूत्रांच्या मते मेसी आता पॅरिस सेंट जर्मन क्लबसोबत काम करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...