आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेसीचा अर्जेंटिना तिसऱ्यांदा चॅम्पियन हाेणार की एमबापेचा फ्रान्स संघ सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव काेरणार हे आता रविवारीच निश्चित हाेणार आहे. उद्या रविवारी हे दाेन्ही संघ फायनलमध्ये समाेरासमाेर असतील. फायनलमधील विजयाने या दाेन्ही पैकी एका टीमला चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळेल. याच फायनलमधील सर्वाेेत्तम खेळीतून मेसी आणि एमबापेला दिग्गज फुटबाॅलपटू पेले-मॅरेडाेनाच्या क्लबमध्ये सहभागी हाेण्याची संधी आहे.
1. पेले-1958 (ब्राझील) { वयाच्या १७ व्या वर्षी पेलेने १९५८ मध्ये २ गाेल करून ब्राझीलला वर्ल्डकपची फायनल जिंकून दिली. ब्राझीलने हा अंतिम सामना ५-२ ने जिंकला.
2.केम्पेस 1978 (अर्जेंटिना) फायनलमध्ये हाॅलंडविरुद्ध दाेन गाेल करून मारिया केम्पेसने अर्जेंटिना संघाला १९७८ मध्ये वर्ल्डकप जिंकून दिला हाेता. यासह अर्जेंिटना संघ पहिल्यांदाच विश्वविजेता ठरला.
3. रॉसी 1982 (इटली) फायनलमध्ये वेस्ट जर्मनीविरुद्ध पाआेलाे राॅसीच्या गाेलने इटली १९८२ मध्ये चॅम्पियन ठरला. इटलीने ३-१ ने सामना जिंकून किताब पटकावला.
4. मॅराडोना 1986 (अर्जेंटीना) मॅराडाेनाने १९८६ च्या स्पर्धेत उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत गाेल केले. तसेच स्पर्धेत पाच गाेल करत अर्जेंटिनाला चॅम्पियनचा बहुमान मिळवून दिला.
5. झिदान 1998 (फ्रान्स) ब्राझीलविरुद्ध फायनलमध्ये २ गाेल करून झिदानने १९९८ मध्ये फ्रान्सला पहिल्यांदा िवश्वविजेतेपद मिळवून दिले. फ्रान्सने ३-० ने सामना जिंकला.
6. रोनाल्डो 2002 (ब्राझील) जर्मनीविरुद्ध फायनलमध्ये दाेन गाेल करून राेनाल्डाेने २००२ मध्ये ब्राझीलला वर्ल्डकप जिंकून दिला. ब्राझीलने २-० ने सामना जिंकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.