आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिडफील्डर अॅलेक्सिस मॅक्स एलिस्टर (४६ वा मि.) आणि फाॅरवर्ड ज्युलियन अल्वारेजने (६७ वा मि.) अर्जेंटिना संघाचा फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. लियाेनेल मेसीच्या अर्जेंटिना संघाने मध्यरात्री पाेलंडचा पराभव केला. अर्जेंटिनाने २-० अशा फरकाने एकतर्फी विजय साजरा केला. यासह अर्जेंटिना संघाने सलग पाचव्यांदा वर्ल्डकपची प्री-क्वार्टर फायनल गाठली आहे. या सामन्यात मेसीची पेनल्टी हुकली. त्याचा गाेल करण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. मात्र, तरीही शानदार विजयासह अर्जेंटिनाला अंतिम १६ मध्ये धडक मारता आली. दुसरीकडे पाेलंड टीमचे पराभवाने काेणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. या पराभवानंतरही पाेलंड संघाला पुढच्या फेरीतील आगेकूच कायम ठेवता आली. अर्जेंटिना संघाने १६ मिनिटांमध्ये दाेन गाेल करून आपला एकतर्फी विजय निश्चित केला. पाेलंड १९८६ नंतर उपउपांत्यपूर्व फेरीत: लेवानडाेस्कीच्या पाेलंड संघाला बुधवारी मध्यरात्री मेसीच्या अर्जेंटिनाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, तरीही टीमची आगेकूचची माेहीम कायम राहिली. यातूनच पाेलंड संघाला १९८६ नंतर वर्ल्डकपच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित करता आला.
सामन्यात सर्वाधिक ९८ पास करणारा मेसी ठरला सामनावीरचा मानकरी; त्याने गाेल करणाऱ्या मॅक्स अॅलिस्टरला दिला आपला पुरस्कार अर्जेंटिनाच्या विजयात मॅक्स अॅलिस्टरचे माेलाचे याेगदान राहिले. त्यामुळे त्याच्या याच कामगिरीचे माेल लियानेल मेसीने जाणले. त्याने आपल्या खिलाडीवृत्तीने त्याच्या कार्याचा वेगळ्या पद्धतीने गाैरव केला. सामन्यात सर्वाधिक ९८ वेळा चेंडू पास करणारा मेसी हा सामनावीर ठरला हाेता. मात्र, त्याने अॅलिस्टरला सामनावीर पुरस्काराने गाैरवले. यादरम्यान ताे भावुक झाला. ‘अर्जेंटिना संघाकडून खेळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझे वडील कार्लाेस हे अर्जेंटिनाचे प्रसिद्ध फुटबाॅलपटू मॅरेडाेनासाेबत खेळले. आता मी मेसीसाेबत याच संघाकडून खेळत आहे, अशा शब्दांत त्याने आपला आनंद व्यक्त केला.मेसीच्या पाठबळानंतर ताे अधिक भावूक झाला हाेता. ----------- फिफा विश्वचषक मेक्सिकाे विजयानंतरही स्पर्धेतून बाहेर लुसैल स्ट्रायकर हेन्री मार्टिन (४७ वा मि.) आणि मिडफील्डर लुईसने (५२ वा मि.) मेक्सिकाे संघाला मध्यरात्री राेमहर्षक विजय मिळवून दिला. मेक्सिकाे संघाने गटातील शेवटच्या सामन्यात आशियातील साैदी अरेबिया टीमवर मात केली. मेक्सिकाेने २-१ ने सामना जिंकला. साैदी अरेबिया संघाकडून लेफ्ट विंगर सालेमने (९०+५ वा मि.) एकमेव गाेल केला. मेक्सिकाेला सरासरीच्या पिछाडीमुळे आगेकूच करता आली नाही. यातून मेक्सिकाे संघ २८ वर्षांनंतर गटातून स्पर्धेबाहेर झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.