आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Messi, Neymar, Mbabane Score Goals Together For PSG, PSG Beat Lorient 5 1 In French League|Marathi News

पॅरिस:मेसी, नेमार, एमबापेने प्रथमच सोबत पीएसजीसाठी केले गोल, पीएसजीने फ्रेंच लीगमध्ये लॉरियंटला 5-1 ने हरवले

फ्रेंच फुटबॉल लीग-14 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेंच फुटबॉल लीग-१ मध्ये पीएसजीने घरच्या मैदानावर लॉरियंटला ५-१ ने हरवले. संघाचा हा एकूण ३० सामन्यांतील २१ वा विजय ठरला. संघ ६८ गुणांसह तालिकेत अव्वलस्थानी कायम असून टीम मार्सिले ५६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पीएसजी २० ऑगस्ट २०२१ पासून तालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहे. पीएसजीच्या नेमारने १२ व्या व ९० व्या, किलियन एमबापेने २८ व्या व ६७ व्या आणि लियोनेल मेसीने ७३ व्या मिनिटाला गोल केला. या तिन्ही खेळाडूंनी पीएसजीकडून खेळताना प्रथमच एकत्र गोल केले.

लॉरियंटच्या तेरेम मॉफीने ५६ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. दुसरीकडे, स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगामध्ये बार्सिलोनाने सेव्हिलाला १-० ने मात दिली. हाफपर्यंत दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. अखेरच्या क्षणी गोंजालेजने ७२ व्या मिनिटाला गोल करत संघाला विजयी केले. बार्सिलोना सलग १४ व्या सामन्यापासून अजेय आहे. संघाचा अखेरचा पराभव ४ डिसेंबर २०२१ राेजी झाला होता. ---------------------------------------------- टेनिस \ अल्कराज मियामी जिंकणारा सर्वात युवा खेळाडू, स्पेनच्या 18 वर्षीय अल्कराजने करिअरमध्ये पहिला मास्टर्स 1000 किताब जिंकला स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्कराज गार्फियाने अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत दाखवून दिले की, तो भविष्यातील खेळाडू नव्हे, तर सध्याचाही स्टार खेळाडू आहे. तो गत महिन्यात इंडियन वेल्सच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्याने रविवारी मियामी मास्टर्सचा किताब जिंकला. १४ व्या मानांकित अल्कराजने जगातील आठव्या क्रमांकावरील कॅस्पर रुडला सलग सेटमध्ये ७-५, ६-४ ने मात दिली. त्याने प्रथमच मास्टर्स १००० किताब जिंकला आहे.

१८ वर्षीय अल्कराज मियामी ओपन जिंकणारा सर्वात युवा खेळाडू बनला. तो मास्टर्स १००० किताब जिंकणारा स्पेनचा राफेल नदाल व अमेरिकेच्या मायकल चेंग नंतर तिसरा युवा खेळाडू आहे. मास्टर्स १००० स्पर्धा ग्रँड स्लॅमनंतर टेनिसमधील दुसरी सर्वात मोठी स्पर्धा असते. मियामी ओपनदरम्यान त्याची जागतिक क्रमवारी १६ होती. सोमवारी जाहीर एटीपी क्रमवारीत तो ११ व्य स्थानी पोहोचला, त्याचे करिअरमधील सर्वोच्च स्थान आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्या कॅमरून नॉरी क्रमवारीत प्रथमच अव्वल-१० मध्ये समावेश झाला. तो सध्या क्रमवारीमध्ये दहाव्यास्थानी आहे. नोवाक योकोविक पहिल्या आणि डॅनियल मेदवेदेव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बातम्या आणखी आहेत...