आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:20 वर्षांपूर्वी पेपर नॅपकिनवर करार करणारा मेसी सोडतोय बार्सिलोना क्लब, स्पॅनिश चाहत्यांनी कॅम्पनाऊ मैदानाबाहेर केले आंदोलन

बार्सिलोना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेसीचा बार्सिलोना क्लबसोबतचा करार आला संपुष्टात

मेसीचा करारनामा ६१४४ काेटी रुपयांचा, हंगाम वाढल्यास करारही हंगामाच्या अखेरपर्यंत असेल चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य सामन्यात बायर्न म्युनिचकडून २-८ ने पराभव झाल्यानंतर बार्सिलोना क्लबमध्ये खळबळ माजली आहे. याचे कारण म्हणजे लिओनल मेसी क्लब सोडत आहे. फॅक्सद्वारे त्याने क्लबला ही माहिती दिली. करारानुसार मेसीला जेव्हा वाटेल तेव्हा संघाला सोडू शकतो. तर करार १० जूनला संपला आहे व २०२१ पर्यंत संघासोबत करार असल्याचे बार्सिलोनाचे म्हणणेे आहे. मेसीचा करार ६१४४ कोटी रुपयांचा आहे. लीगल टीमला वाटते की, कोरोनामुळे हंगाम ऑगस्टपर्यंत वाढला तर करारदेखील शेवटपर्यंत हवा. यावर बार्सिलोनाच्या संचालक मंडळाची लवकरच बैठक होऊ शकते. लोकांना वाटते की, फक्त क्लबचे अध्यक्ष जोसेफ यांचा राजीनामा व निवडणूकच मेसीला थांबवू शकते. दरम्यान, मेसीच्या चाहत्यांनी कॅम्पनाऊ मैदानाबाहेर आंदोलन केले.

१० वर्षांचा असताना गंभीर आजार झाल्याने बार्सिलोनाने दिला मदतीचा हात
६ वर्षांचा असताना मेस्सी फुटबॉल घेऊन रस्त्यांवर १५- २० मिनिटे न थांबता पायांनी जगलिंग करायचा. चेंडू खाली पडायचा नाही. लहान मुलाला असे करताना बघून लोक बक्षीस म्हणून पैसे द्यायचे. भविष्याचा फुटबॉलपटू असे लोक म्हणू लागले. मेसी दहा वर्षांचा असताना समजले की त्याला ‘ग्रोथ हार्मोन डेफिशिएन्सी’ आजार आहे. यामुळे शरीराची वाढ खुंटते. त्यावरील उपचारासाठी दरमहा १००० डॉलर खर्च करणे त्यांच्या कुटुंबासाठी अवघड होते. तेव्हा मेसीचा खेळ बघून आपल्या संघात सामील करून घेण्यास इच्छुक असलेल्या नेवल्स ओल्ड बॉय क्लबने बार्सिलोना क्लबला माहिती दिली. मेसीने युराेपात स्थायिक व्हावे या अटीवर बार्सिलोना त्याच्या उपचारावरील खर्च उचलायला तयार झाला. त्याचे कुटुंब युरोपात गेले. मेसी २००० मध्ये १३ वर्षांचा असताना बार्सिलोनात सामील झाला. कागद नसल्याने त्याने एका नॅपकिन पेपरवर करार केला होता. २००४ मध्ये वरिष्ठ संघात स्थान मिळाले. नंतर जगातील सर्वात मोठा स्ट्रायकर्स म्हणून त्याची गणना होऊ लागली. क्लबसाठी खेळलेल्या ७३१ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ६३४ गोल आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser