आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Michael jordan will donate rs 755 crore for social justice 10 times more than facebook and amazon

वर्णभेदाविरोधात लढाई :मायकल जॉर्डन सामाजिक न्यायासाठी 755 कोटी रुपये दान करणार, फेसबुक आणि अमेझॉनपेक्षा 10 पट जास्त

स्पोर्ट डेस्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'वर्णभेद नष्ट होईपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार'

स्टार बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन सामाजिक न्याय आणि वर्णभेदाविरोधात लढत असलेल्या संघटनांना 100 मिलियन डॉलर (अंदाजे 755 कोटी) रुपेय दान करणार आहे. जॉर्डन आणि त्याचा ब्रँड या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना पुढील 10 वर्षांपर्यंत फंडींग करणार आहे. हे डोनेशन फेसबुक आणि अॅमेझनॉने केलेल्या दानापेक्षा 10 पट जास्त आहे. या दोन्ही कंपन्यांनी सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना 10 मिलियन डॉलर (अंदाजे 75 कोटी रुपये) दान करण्याची घोषणा केली आहे.

जॉर्डनने ही घोषणा अशावेळी केली आहे, जेव्हा अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर देशभरात आंदोलन पेटले.

कृष्णवर्णीय व्यक्तीची किंमत असेल: जॉर्डन

जॉर्डन आणि त्याच्या ब्रँडने एक निवेदन जारी करत म्हटले की, कृष्णवर्णय व्यक्तीच्या आयुष्याचीही किंमत असते. जोपर्यंत देशातून वर्णभेद नष्ट होत नाही, तोपर्यंत आम्ही कृष्णवर्णीयांच्या सुरक्षेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी लढत राहणार.

कृष्णवर्णीय समाजाच्या आयुष्यात बदल घडवण्याचे ध्येय: ब्रँड जॉर्डन

ब्रँड जॉर्डनचे प्रेसिडेंट क्रेग विलियम्सने म्हटले की, कृष्णवर्णीय समाजाच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी अजून खूप काम करायचे आहे. आम्ही याची जबाबदारी घेऊ.

फ्लॉयडच्या मृत्यूवर जॉर्डन यांनी नाराजी व्यक्त केली आहे

यापूर्वीच, जॉर्डनने फ्लॉयडच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत म्हटले की, मी या घटनेमुळे दुखी आणि रागात आहे. मी फ्लॉयडच्या कुटुंबासह त्या सर्व लोकांच्या कुटुंबासोबत आहे, ज्यांनी वर्णभेदामुळे जवळचा व्यक्ती गमावला आहे. आता खूप झाले, आपल्याला एकजुट होऊन वर्णभेदाविरोधात एकत्रित येण्याची गरज आहे. 

0