आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mirabai Chanu Tokyo Olympic Medal | Indian Weightlifter Mirabai Chanu Success Story & Life History; News And Live Updates

मीराबाईची गोष्ट:ऑलिम्पिकमध्ये मीराबाईने मिळवले रौप्यपदक, वेटलिफ्टिंगमधील 21 वर्षाच्या प्रतीक्षेचा झाला अंत; 2016 च्या पराभवामुळे वेटलिफ्टिंग सोडण्याचा केला होता निर्धार

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी मीराबाईने काय सांगितले होते?

भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. त्यांनी 49 किलो वजन गटात 202 किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकले आहे. यामुळे भारताच्या 21 वर्षाच्या प्रतीक्षेचा अंत झाला आहे.

कारण यापूर्वी भारताने 2000 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये पदक पटकावले होते. त्यावेळी सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी यांनी कांस्यपदक जिंकले होते. मीराबाईचे हे यश यासाठी विशेष आहे, कारण त्यांनी 2016 मध्ये कोणत्याही प्रयत्नात योग्य प्रकारे वजन उचलू शकली नव्हती. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला येथे अपात्र ठरवण्यात आले होते.

ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी मीराबाईने काय सांगितले होते?
टोकियो ऑलिम्पिक 2020 ला जाण्यापूर्वी मीराबाईने दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, मी यावेळी टोकियो ऑलिम्पिकमधून हमखास पदक जिंकेल. कारण माझ्याजवळ ऑलिम्पिक खेळण्याचा अनुभव आहे. यापूर्वी मी माझ्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये पदक गमावले होते. तेंव्हा माझ्याजवळ कमी अनुभव असल्याने मला पदक पटकावता आले नव्हते.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकासह मीराबाई चानू.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकासह मीराबाई चानू.

मीरा यांची 'डिड नॉट फिनिश' ते चैंपियन बनण्याची गोष्ट
महिला वेटलिफ्टर मीराबाई यांची रियो ऑलिम्पिक 2016 ते ऑलिम्पिक चॅम्पियन होण्याची गोष्ट जबरदस्त आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये मीरा योग्य प्रकारे वजन उचलू शकली नव्हती. तेंव्हा त्यांच्या नावासमोर 'डिड नॉट फिनिश' लिहले गेले होते. त्यामुळे ती खूपच खचली होती. कारण स्पर्धेत एखादा खेळाडू मागे राहणे आणि पात्र न होणे यामध्ये फरक आहे. या पराभवामुळे ती नैराश्यात गेली आणि तीला मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती.

या पराभवामुळे ती स्तब्ध झाली असून वेटलिफ्टिंगमधून तीन निरोप घेण्याचा मनापासून विचार केला होता. परंतु, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ती असे करु शकली नाही. त्यानंतर 2018 मध्ये तीने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण आणि आता ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकेल आहे.

2016 मधील मीराबाई चानू यांचे फोटो
2016 मधील मीराबाई चानू यांचे फोटो

2017 मध्ये वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले
मीराने 2017 मध्ये 194 किलो वजन उचलून वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. 22 वर्षात अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला होती. या यशासाठी तीने काही दिवस जेवणदेखील सोडले होते. आपल्या सख्या बहिनीच्या लग्नातदेखील ती जाऊ शकली नव्हती. हे पदक जिंकल्यानंतर तीच्या डोळ्यातून पाणी आले होते. 2016 मधील तो पराभव अजूनही तीच्या मनामध्ये सलत होता.

वर्ल्ड वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय
वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी मीराबाई ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. 2017 मध्ये (49 किलो वजनाच्या श्रेणीत) त्यांनी ही कामगिरी केली होती. 2014 च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये 49 किलो वजन गटात त्यांनी रौप्य पदक जिंकले. तर 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाईने सुवर्णपदक जिंकले होते.

टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम स्पर्धेदरम्यान मीराबाई चानू...
टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम स्पर्धेदरम्यान मीराबाई चानू...

दुखापतीनंतर 2019 मध्ये शानदार पुनरागमन
मीराबाईंना 2018 मध्ये पाठदुखीचा सामना करावा लागला होता. तथापि, 2019 च्या थायलंड वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून पुनरागमन करत मीराबाईने चौथ्या क्रमांक पटकावला होता. तेंव्हा त्यांनी प्रथमच 200 किलोपेक्षा जास्त वजन उचलले होते. चानू सांगते की, "त्यावेळी मला भारत सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळाला. मला उपचारासाठी अमेरिकेत पाठवण्यात आलं. त्यानंतर मी पुनरागमनचं केले नाही तर माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठे वजन उचलण्यात यशस्वी झाले."

मीराबाईने केला विश्वविक्रम
ताशकंद एशियन वेटलिफ्टिंग चँपियनशिपमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात (2021) मीराबाई चानूने 86 किलो वजन उचलले होते. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो वजन उचलत विश्वविक्रम नोंदवला होता. त्यावेळी त्यांनी एकूण 205 किलो वजनासह तिसऱ्या स्थानावर राहिली होती. यापूर्वी क्लीन अँड जर्कचा जागतिक विक्रम 118 किलो होता. चानू हीचा 49 किलो वजन गटात वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी 203 किलो (88 किलो व 115 किलो) आहे. हा विश्वविक्रम तीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय स्पर्धेत केला होता.

मीराबाई चानू आपल्या आईसोबत...
मीराबाई चानू आपल्या आईसोबत...

वेटलिफ्टिंगमध्ये वयाच्या 11 व्या वर्षी पहिले पदक जिंकले
मीराबाई मणिपूरच्या इम्फाळची आहे. स्थानिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी वेटलिफ्टिंगमधील पहिले सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात जागतिक व कनिष्ठ आशियाई स्पर्धेतून केली. ती कुंजाराणी देवीला तिची रोल मॉडेल मानते.

विजयानंतर मीराबाईने तिच्या आईची आठवण केली
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवल्यानंतर मीराबाई म्हणाल्या की, हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. मी हे पदक माझ्या देशाला आणि इथल्या कोट्यावधी लोकांना समर्पित करते. त्याने सतत माझ्यासाठी प्रार्थना केली. त्यामुळेच मी पदक जिंकू शकले. मला माझ्या कुटुंबातील सदस्यांचे आभार मानायचे आहेत. या प्रवासात माझ्या आईने मला खूप सहकार्य केले. त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्यासाठी अनेक त्याग केले.

बातम्या आणखी आहेत...