आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
| क्रीडा विभागात बाेगस अाणि अतिरिक्त पदभरतीत दाेषी उपसंचालकांनाच पाठीशी घातले जात अाहे. यासाठी अतिरिक्त पदभरतीचा चाैकशी अहवालच विभागाने अद्याप तयार केला नाही. यामुळे या गंभीर प्रकरणापासून मंंत्रालयाला अंधारात ठेवले जात अाहे. रिपाेर्ट सादर करून ताे अहवाल असल्याचा कांगावा केला. यातून अाता दीड वर्षापासून या गंभीर प्रकरणाकडे विभागाकडून कानाडाेळा हाेत अाहे. यासाठी चक्क तत्कालीन अायुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अादेशानुसार तयार चाैकशी अहवाल चुकीचा ठरवण्यात अाला. त्यानंतर या प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष करत अद्याप याचा अहवालच तयार केलेला नाही. त्यामुळे दाेषी अधिकारी विभागात कार्यरत अाहेत.
क्रीडा विभागात २०१५ ते २०१७ दरम्यान तत्कालीन उपसंचालकांनी तीन टप्प्यात एकूण ३५ जागांची भरती केली. मात्र, चाैकशीत ही अतिरिक्त पदभरती असल्याचे समाेर अाले.
२०१८ चा अहवाल: तिघांवर कायदेशीर कारवाईच्या सुचना एनसीसीत बाेगस पदभरती करण्यात अाल्याचे तत्कालीन क्रीडा अायुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निदर्शनास अाले हाेते. त्यांनी तत्काळ दाेन सदस्यीय चाैकशी समिती स्थापन केली अाहे. समितीने अाॅक्टाेबर २०१८ राेजी हा अहवाल सादर केला. यात तत्कालीन उपसंचालकांच्या कामकाजावर ठपका ठेवला. ही अतिरिक्त पदभरती झाल्याचे निदर्शनास अाणून दिले. याप्रकरणी उपसंचालकांवर कारवाईच्या सूचनाही केल्या. तसेच प्र. उपसंचालक विजय संतान व लिपिक अमित खाेमणेवर तत्काळ कायदेशीर कारवाईचे स्पष्ट नमूद केले.
अाम्ही अहवाल पाठवला
विभागात तीन वेळा झालेल्या अतिरिक्त ३५ पदभरतीबाबतचा अहवाल अाम्ही पाठवला अाहे. यामध्ये या प्रकरणाबाबतची सर्व माहिती देण्यात अाली. याबाबत वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील. अाेमप्रकाश बकाेरिया, क्रीडा आयुक्त,पुणे
नवे अायुक्त, नवा अहवाल : दाेन वर्षांपासून दुर्लक्ष
नवीन अायुक्त अाेमप्रकाश बकाेरिया येताच तत्कालीन अायुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अादेशाने तयार केलेल्या अहवालात त्रुटी असल्याचे सांगून रद्द झाला. यामध्ये प्र. उपसंचालक विजय संतान यांची बाजू समजून न घेतल्याचा ठपका ठेवण्यात अाला. त्यानंतर दाेन वर्षापासून अद्याप या गंभीर प्रकरणावर चाैकशी अहवाल तयार झालेला नाही.
अहवाल अालाच नाही
क्रीडा विभागात पदभरतीबाबतचा चाैकशी अहवाल अामच्याकडे अद्याप अालेला नाही. रिपाेर्ट सादर केला. त्याला अहवाल म्हणता येणार नाही. या प्रकरणाबाबतची माहिती अामच्याकडे नाही. सविता नानल, उपसचिव,शिक्षण अाणि क्रीडा मंत्रालय, मुंबई
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.