आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अडचणी वाढत आहेत. महासंघाच्या खात्यातील सरकारी पैशाच्या आर्थिक अनियमिततेच्या चौकशीच्या कामाला कॅगच्या चारसदस्यीय तपास पथकाने सहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मंत्रालयाने २०१७-२०१८ ते २०२०-२०२१ पर्यंत महासंघाच्या खात्यांची तपासणी १७ ते ३० मेदरम्यान पूर्ण करण्यास कॅगला लेखी सांगितले होते, मात्र अनेक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने हा तपास ५ जूनपर्यंत वाढवला. महासंघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅग सर्व संशयीत खर्चाच्या तपशिलांसह विविध निविदांच्या वाटपाचा तपशील शोधत आहेत. त्याचबरोबर महासंघाच्या वित्त विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यालाही मुख्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.