आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:मितालीचा ‘फिडे इन्स्ट्रक्टर’ने गाैरव; मराठवाड्यातील एकमेव

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशिक्षणातील उल्लेखनीय कामगिरीतून माजी राष्ट्रकुल चॅम्पियन बुद्धिबळपटू मिताली पाटीलचा नुकताच फिडे इन्स्ट्रक्टर किताबाने गाैरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशनने औरंगाबादच्या बुद्धिबळपटूचा हा सन्मान केला. अशा प्रकारचा जागतिक स्तरावरचा पुरस्कार पटकावणारी मिताली ही मराठवाड्यातील पहिलीच महिला बुद्धिबळ प्रशिक्षक ठरली. बुद्धिबळपटू मितालीच्या नावे दाेन वर्ल्ड टायटल आहेत. प्रशिक्षणामध्येही तिची कामगिरी लक्षवेधी ठरणारी आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी अंध बुद्धिबळपटूने युराेपातील बाटूमी येथील वर्ल्ड बुद्धिबळ आॅलिम्पियाड स्पर्धेत अव्वल कामगिरी केली. याशिवाय फिडेच्या वतीने या पुरस्कारासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतही तिने बाजी मारली. मिताली द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.

आत्मविश्वास द्विगुणित : मिताली

प्रशिक्षणाची साधना अखंडपणे करत अनेक खेळाडूंना सखाेल पद्धतीने बुद्धिबळाची आेळख करून दिली आहेे. याच तंत्रशुद्ध प्रशिक्षणातून अनेक खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन करत आहेत. त्यांच्या याच यशामुळे माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. याच कार्याची दखल घेऊन जागतिक संघटनेने माेठ्या पुरस्काराने केलेला गाैरव माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दात मितालीने आनंद व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...