आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mithila Wins Gold, Partha Korade And Partha Salunkhe In Final, Winning Start In Kho Kho

खेलो इंडिया युवा स्पर्धा:मिथिला भोसलेने जिंकले सुवर्णपदक, पार्थ कोरडे व पार्थ साळुंखे फायनलमध्ये, खो-खोमध्ये विजयी सुरुवात

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला (हरियाणा) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने आपली पदकाची लय कायम ठेवली आहे. शुक्रवारी ज्युदो प्रकारात मिथिला भोसलेने महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केले. त्याचबरोबर धनुर्विद्यामध्ये अहमदनगरचा पार्थ कोरडे व साताऱ्याचा पार्थ साळुंखेने फायनलमध्ये प्रवेश केला. खो-खो महाराष्ट्राच्या मुला- मुलींच्या संघाने विजयी सलामी दिली.

ज्युदोमध्ये मुलींच्या 40 किलो वजन गटात ठाण्याच्या मिथिला मंगेश भोसलेने सुवर्णपदक आपल्या नावे केले. तिला तिचे वडील प्रशिक्षक मंगेश भोसले हे स्वतः मार्गदर्शन करतात.

धनुर्विद्यात शनिवारी मिळणार पदके

अहमदनगरच्या आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू पार्थ कोरडेने कंपाऊंड प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला. तो प्रशिक्षक अभिजित दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो. पार्थ साळुंकेने रिकव्हर प्रकारात फायनल गाठली.

हे खेळाडूही अंतीम फेरीत

धनुर्विद्यामध्ये आदिती स्वामी, ऋतुजा कासल, सानिका मोरे, प्रथमेश जवकर, स्वामी दळवी, मिहीर अपर यांनी देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

जलतरण : अन्या वालाला आणखी एक रौप्य पदक

जलतरणमध्ये मुलींच्या 100 मीटर फ्री स्टाइल प्रकारात महाराष्ट्राच्या अन्या वालाने रौप्यपदक आपल्या नावे केले. गटात दिल्लीच्या जान्हवी चौधरीने 59.06 सेकंदाची वेळ घेत सुवर्णपदक जिंकले. तसेच अन्याने 1.00.09 सेकंदासह रौप्य आणि कर्नाटकच्या नीना व्यंकटेशने 1.00.50 सेकंदाचा वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले.

बातम्या आणखी आहेत...