आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Mobile In The Role Of Digital Guru, Online Mantra Of Success For Players; Training Through New Technology

गुरुपौर्णिमा विशेष:डिजिटल गुरूच्या भूमिकेत माेबाइल, खेळाडूंसाठी यशाचा ऑनलाइन मंत्र; नव्या टेक्नाॅलाॅजीच्या माध्यमातून प्रशिक्षण

एकनाथ पाठक | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिजिटल माध्यमातून प्रशिक्षणाचा मार्ग अधिक साेपा; खेळाडूही अधिक उत्सुक
  • लाॅकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून प्रशिक्षणाला ब्रेक

काेराेना महामारीमुळे जगभरातील सर्वच क्षेत्रातील कार्य बंद झालेले आहेत. याचा माेठा विपरीत परिणाम स्पाेर्ट्स इव्हेंट आणि काेचिंगवरही पडला. यामुळे अनेक काेच आर्थिक अडचणीत सापडले. मात्र, याच संकटाला एक संधी मानून राज्यातील प्रशिक्षकांनी आपल्या प्रशिक्षण कार्याच्या साधनेला कायम ठेवले. यातून प्रशिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य कायम ठेवण्यासाठी नव्या आणि अत्याधुनिक साधनांची जाेड दिली. त्यामुळे अत्याधुनिक स्वरूपातील माेबाइल हा खेळाडूंसाठी डिजिटल काेचच्या भूमिकेत आला आहे. यावरून मिळत असलेल्या ऑनलाइन यशाच्या मंत्रातून खेळाडू आपल्या कामगिरीचा दर्जा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

मागील चार महिन्यांपासून राज्यातील स्पाेर्ट्स स्टेडियम पुर्णपणे बंद आहे. त्यामुळे काेचचे क्लासेस बंद आहे. त्यामुळे हे सर्व जण आर्थिक अडचणीत आहे. मात्र, अशातही काेच माेबाइलच्या माध्यमातून खेळाडूंना टिप्स देत आहेत. काेणत्याही मानधनाशिवाय हे सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन वर्कआऊटमुळे खेळाडू आपल्या सरावात सातत्य ठेवत आहेत.

लाॅकडाऊनमुळे ५० लाखांचे काेचिंग मार्केट ठप्प

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंमध्ये पुणे, मुंबई, औरंगाबादचा टक्का माेठा आहे. या शहरात सर्वच इव्हेंटचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. यातूनच या शहरामध्ये जवळपास ५० लाखांचे काेचिंगचे मार्केट आहे. विविध इव्हेंटचे काेच या दाेन महिन्यात ही कमाई करतात. यंदा लाॅकडाऊनने याला ब्रेक लागला. असे असतानाही काेच काेणतीही फी न आकारता माेफत ऑनलाइन काेचिंग करत आहेत. हे खेळाडूंसाठी फायदेशीर ठरत आहे.

तीन महिन्यांपासून ऑनलाइनवर काेचिंगला पसंती

काेराेनाचे संकट काहीसे जीवघेणे आहे. मात्र, याकडे सकारात्मक नजरेने पाहणे गरजेचे आहे. याच महामारीमुळे आपल्याला अनेक महत्त्वाच्या गाेष्टी शिकवल्या आहेत. यामुळेच आज क्रीडा विश्व पूर्णपणे डिजिटल झाले. काेच आणि काेचिंगही आता याच अत्याधुनिक साहित्याच्या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळेच आमच्यासाठी माेबाइलसारखी साधने ही डिजिटल गुरूच्या भूमिकेत आहे. यामुळे अनेक दूरचे अंतरही कमी झाले आहे. त्याचा निश्चित असा फायदा हाेत आहे. वर्कआऊट पूर्ण करण्याचे टार्गेट असते. खुशी, बास्केटबाॅलपटू

युवांकडून टेक्नाेसॅव्ही पद्धत आत्मसात; प्रगतीचा आलेख उंचावला

काेराेनामुळे युवा आणि सीनियर खेळाडूंना घरीच बसावे लागले. मात्र, याच संकटाने युवा खेळाडूंना अनेक गाेष्टी आत्मसात करायला भाग पाडले. यामुळेच खेळाडूंना माेठा फायदा झाला. खेळाडूंनी ऑनलाइन वर्कआऊटच्या माध्यमातून टेक्नाेसॅव्ही पद्धत आत्मसात केली. अॅपच्या माध्यमातून हे खेळाडू आपल्या सरावाच्या साधनेला कायम ठेवत आहे. त्यामुळे कामगिरीचा दर्जा उंचावण्याचा या सर्वांना विश्वास आहे.

टेक्नाॅलॉजीने नवसंजीवनी

संकटात सापडलेल्या प्रत्येकाला टेक्नाॅलाॅजी ही नवसंजीवणी ठरली. ऑनलाइनमुळे सर्वांना वेगळे शिकण्याची संधी मिळाली. विविध मार्गदर्शकही सहजपणे नव्या तंत्रज्ञानामुळे बाेलते झाले. त्याचा सर्वांना माेठा फायदा झाला. उदय डाेंगरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते

प्रचंड वेगाने आत्मसात

डिजिटलच्या माध्यमातून आता खेळाडू प्रचंड वेगाने सर्व गाेष्टी आत्मसात करत आहेत. त्यामुळे त्यांची ही पाॅवरही वाढली. त्याचा भविष्यात सर्वांना माेठा फायदा हाेईल. हे संकटही दूर हाेईल. त्यासाठी सर्व जण उत्सुक आहेत. सूरज ताकसांडे, काेच जिम्नॅस्टिक

ऑनलाइन साेयीस्कर

अत्याधुनिक सुविधांच्या वापरातूनच क्रिकेटचे धडेही ऑनलाइनवरच्या मार्गदर्शनातून गिरवल्या जात आहे. अकादमी मधील युवकांना व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे अधिक साेपे झाले आहे. त्यामुळे हा मार्ग साेयीस्कर आहे. दिनेश कुंटे, रणजीपटू व काेच

वेबिनारने सखाेल टिप्स

लाॅकडाऊनमुळे सर्व खेळाडूंना आता ऑनलाइन मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये वेबिनारमधून अनेक महत्त्वाच्या टिप्स देत आहाेत. त्याचा निश्चित सर्वच युवा खेळाडूंना फायदा हाेत आहे. बेसिकसाठी हे फायदेशीर ठरले. गणेश कड, सचिव, बास्केटबाॅल.

0