आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाच्या युवा वेगवान गाेलंदाज उमरान मलिकमध्ये जगातील नंबर वन गाेलंदाज हाेण्याची प्रचंड क्षमता आहे. त्याला फक्त गाेलंदाजी करताना लाइन-लेंथवर दर्जेदार खेळी करावी लागणार आहे. यातून त्याला आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावता येईल. हीच दर्जेदार गाेलंदाजी मैदानावर तरबेज फलंदाजांसाठी डाेकेदुखी ठरेल, असा सल्ला वेगवान गाेलंदाज शमीने आपल्या संघातील युवा गाेलंदाज मलिकला दिला आहे. जम्मू-काश्मीरचा मलिक हा मैदानावर १५० किमी/प्रतितासाच्या वेगाने चेंडू टाकताे. त्यामुळे त्याची सामन्यादरम्यानची खेळी लक्षवेधी ठरते. त्याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत ७ वनडे सामन्यांत १२ आणि ६ टी-२० सामन्यांमध्ये ९ बळी घेतले आहेत. आता त्याला तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळण्याचे चित्र आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या मंगळवारी इंदूरच्या मैदानावर मालिकेतील तिसरा वनडे सामना रंगणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.