आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mohammed Shami Thought Of Committing Suicide After Wife Hasin Jahan File Case Agaisnt Him; Domestic Violence FIR News Updates

खुलासा:'मी तीन वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला होता', क्रिकेटर मोहम्मद शमीचा लाइव्ह चॅटींगदरम्यान खुलासा

स्पोर्ट डेस्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शमीविरोधात पत्नी हसीन जहांने 2018 मध्ये हिंसाचाराचा आरोप केला होता

भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या वाईट काळाची आठवण काढत एक मोठा खुलासा केला आहे. शमीने शनिवारी रोहित शर्मासोबत इंस्टाग्राम लाइव्ह चॅटिंगदरम्यान सांगितले की, '2015 च्या विश्वचषकानंतर माझ्याच्या आयुष्यात खुप वाईट काळ सुरू झाला होता. माझ्या मनात तीन वेळा आत्महत्या करण्याचा विचार आला होता.' शमीचा फ्लॅट 24 व्या मजल्यावर आहे. त्याच्या घरच्यांना भीती होती की, तो वरुन उडी मारेल. शमी याकाळात दुखापतीमुळे 18 महीने संघाच्या बाहेर होता. त्यानंतर 2018 मध्ये पत्नी हसीन जहांने त्याच्यावर घुरगुती हिंसाचाराचा आरोप लावला होता.

शमी पुढे म्हणाला की, ‘‘यादरम्यान खासगी आयुष्यात मी खूप वाईट काळातून जात होतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी तीन वेळेस आत्महत्या करण्याचा विचार केला होता. माझ्या कुटुंबियांना माझ्याबद्दल खूप चिंता वाटायची. मी 24 व्या मजल्यावर राहायचो, घरच्यांना वाटायचे की, मी वरुन उडी मारेल. त्या वेळेस मी क्रिकेटबद्दल विचार करत नव्हतो. क्रिकेट सोडून देण्याचाही विचार मनात आला होता.’’

कुटुंबाच्या पाठिंब्याने परत येऊ शकलो: शमी

शमी पुढे म्हणाला की, ‘‘कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला. त्यांनी मला समजून सांगितले की, समस्या लहान असो वा मोठी, समाधान काढता येतेच. या काळात माझ्या भावाने माझी खूप मदत केली. माझे 2-3 मित्र 24 तास माझ्यासोबत असायचे. आई-वडिलांनी सांगितले की, या त्रासातून बाहेर येण्यासाठी क्रिकेटवरच लक्ष द्यायचे आहे. त्यानंतर मी ट्रेनिंग सुरू केली आणि वापसी केली.’’

काय आहे शमी-हसीन जहां प्रकरण ?

शमीवर पत्नी हसीन जहांने हुंड्यासाठी मारहाण, मारहाण, मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप लावले होते. तिने आपल्या फेसबूक अकाउंटवर अनेक फोटोज शेअर करत शमीवर अनेक महिलांसोबत संबंध असल्याचाही आरोप लावला होता. तिने शमी आणि महिलांसोबत झालेल्या चॅटींगचे स्क्रीन शॉटही शेअर केले होते. पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमदविरोधात अटक वॉरंटदेखील जारी केला होता. परंतू, नंतर यांना रद्द करण्यात आले. बीसीसीआयनेही चौकशीनंतर शमीला क्लीन चीट दिली होती.

बातम्या आणखी आहेत...