आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mohammed Siraj | India VS England 3rd Test; Ball Thrown At Mohammed Siraj On Day 1

इंग्रजी प्रेक्षकांना सडेतोड उत्तर:फिल्डिंग करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजाला प्रेक्षकांनी चिडवण्यासाठी विचारले- स्कोअर काय झाला, सिराज म्हणाला- भारताची मालिकेत 1-0 ने आघाडी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीचा संघ अवघ्या 78 धावांवर ऑल आऊट झाला. इंग्लंडने एकही विकेट न गमावता 120 धावा केल्या. या मजबूत स्थितीमुळे इंग्लंड समर्थक खूप आनंदी आहेत. हा आनंद आणि उत्साह लीड्समध्ये दिसून आला.

गोलंदाजीनंतर, सीमारेषेजवळ फिल्डींग करण्यासाठी गेलेल्या सिराजला काही प्रेक्षकांनी चिडवले आणि स्कोअर विचारला. सिराजनेही चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय वेगवान गोलंदाजाने हातवारे करत म्हटले की भारत मालिकेत 1-0 पुढे आहे. प्रेक्षकांनी क्षेत्ररक्षण करताना सिराजवर चेंडू फेकला होता.

ऋषभ पंतने सामन्यानंतर केला खुलासा
पहिल्या दिवसाचा सामना संपल्यानंतर भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने खुलासा केला की, क्षेत्ररक्षणादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर प्रेक्षकांनी चेंडू फेकला होता. यानंतर भारतीय कर्णधार कोहली खूप चिडला आणि त्याने सिराजला चेंडू बाहेर फेकण्यास सांगितला. कॅमेऱ्यांमध्ये कोहलीचा रागही दिसत होता.

पंत म्हणाला की, प्रेक्षकांमधील कोणीतरी सिराजवर चेंडू मारला होता, त्यामुळे कोहली चिडला. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही सांगू शकता, परंतु क्षेत्ररक्षकांवर गोष्टी फेकणे योग्य नाही.

सिराजने दोन कसोटीत 11 बळी घेतले आहेत
मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने आठ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने 30 षटकांत 94 धावा देऊन 4 बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने 10.5 षटकांत 32 धावा देऊन 4 बळी घेतले. तो मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांचा समावेश असलेल्या वेगवान गोलंदाजीच्या चौकटीतील तरुण सदस्य आहे.

ऑस्ट्रेलियातही प्रेक्षकांनी वापरले होते अपशब्द
या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद सिराजला प्रेक्षकांकडून गैरवर्तणुकीला सामोरे जावे लागले. सिडनी कसोटी दरम्यान, काही प्रेक्षकांनी त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या आणि त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारली. यामुळे खेळ थांबवावा लागला आणि प्रेक्षकांना स्टेडियमच्या बाहेर नेण्यात आले. त्यानंतर सिराज आणि अजिंक्य रहाणे यांनी पंचांकडे याबाबत तक्रार केली. यामुळे बराच वाद झाला.

बातम्या आणखी आहेत...