आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • More Emphasis On Fitness Through Hard Work Without Materials; National Boxer Devika Ghaerpade's Hard Work

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रीडा:साहित्याशिवाय कसून मेहनतीतून फिटनेसवर अधिक भर; राष्ट्रीय बाॅक्सर देविका घाेरपडेची मेहनत

औरंगाबाद (एकनाथ पाठक)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या घरीच राहून टेरेसवर करते प्रॅक्टिस, फिटनेस आणि गेम डाऊन हाेऊ नये म्हणून प्रचंड कसरत
  • सकाळी फिटनेस आणि संध्याकाळी शॅडाे प्रॅक्टिस
  • याेगा आणि व्यायामाच्या माध्यमातून मानसिक दबाव दूर, डाएटही घेत आहे प्राॅपर

सध्याच्या गंभीर परिस्थितीमध्ये काेेराेनाच्या आव्हानाला परतावून लावण्यासाठी आपण सर्वच जण प्रचंड मेहनत घेत आहाेत. अशीच मेहनत मी सध्या आपली दर्जेदार कामगिरी आणि फिटनेस कायम ठेवण्यासाठी घेत आहे. त्यामुळे मला आगामी स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करता येईल. यासाठी साहित्याशिवाय मी फिटनेस कायम ठेवण्यावर अधिक भर देत असल्याची प्रतिक्रिया खेलाे इंडियातील पदक विजेती युवा बाॅक्सर देविका घाेरपडेने दिली. ती सध्या लाॅकडाऊनमुळे आपल्या मूळ गावी सातारा येथेच अडकून पडली आहे. या ठिकाणी तिला साहित्याशिवाय बाॅक्सिंगचा सराव करावा लागत आहे.

शॅडाे प्रॅक्टिसने कामगिरी उंचावणार 

मागील दाेन महिन्यांपासून सर्वच इव्हेंट बंद असल्याने सर्व खेळाडूंना घरीच वर्कआऊट करावे लागत आहे. मात्र, हीच सध्या माेलाची वेळ सर्वांसाठी आहे. यादरम्यान प्रत्येकाने शॅडाेे प्रॅक्टिसमधून आपल्या कामगिरीचा दर्जा उंचवावा. मी सध्या हेच करत आहे. माझ्याकडे साहित्य नाही. मात्र, टेरेसवर मी शॅडाे प्रॅक्टिस सातत्याने करते, असेही देविकाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...