आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालिबानी राजवटीमुळे अफगाणिस्तानमधील क्रीडा मैदाने रिकामे झाली आहेत. मात्र तरीही स्थानिक खेळाडूंच्या डाेळ्यातील क्रीडाविश्वात वेगळे काही करण्याची स्वप्ने तशीच कायम आहेत. याच स्वप्नपूर्तीसाठी आता अफगाणिस्तानच्या महिला फुटबाॅलपटूंनी ऑस्ट्रेलियाकडे आपला माेर्चा वळवला. या महिला फुटबाॅलपटू या ठिकाणी फुटबाॅलच्या आपल्या छंदाला चालना देण्यासाठी कसून मेहनत घेत आहेत. यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या उदरनिर्वाहासाठी पार्ट टाइम नाेकरी करावी लागत आहे. मात्र, तरीही त्यांनी फुटबाॅलवरचे आपले प्रेम कमी हाेऊ दिले नाही. यातूनच फुटबाॅलसाठी वाट्टेल ते करण्याची त्याची हीच जिद्द प्रेरणादायी आहे.
सध्या याच महिला फुटबाॅलपटूंची नजर फिफाच्या अधिकृत मान्यतेकडे लागली आहे. कारण अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय फुटबाॅल संघाला अद्याप फिफाची अधिकृत मान्यता नाही. यामुळेच या संघांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील प्रवेशाला अडसर निर्माण झाला आहे. १९९९ मध्ये तालिबानी राजवटीने अफगाणिस्तानवर आपला कब्जा केला हाेता. यामुळेच फिफाने या संघाची अधिकृत मान्यता काढून घेतली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.