आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफिफा वर्ल्डकपच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी रात्री मोरोक्कोने पोर्तुगालला १-० ने हरवून सेमीफायनलमध्ये धडक मारली. मोरोक्को टॉप-४ मध्ये पोहोचणारा पहिला आफ्रिकन आणि अरेबिक देश आहे. यापूर्वी १९९० मध्ये कॅमेरून, २००० मध्ये सेनेगल व घाना २०१० मध्ये उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाले होते. यासोबतच स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. सामना गमावल्यानंतर रोनाल्डो मैदानातच बसून अश्रू ढाळताना दिसला. यानंतर ते स्टेडियमबाहेर निघून गेला. मोरोक्कोकडून एन. नेसरीने ४२ व्या मिनिटाला हेडरने एकमेव गोल केला. यानंतर ५१ व्या मिनिटाला राफेल गुरेरोच्या जागी रोनाल्डो मैदानात उतरला. मात्र तो कुठलीही कमाल करू शकला नाही.
{संपूर्ण वर्ल्डकपमध्ये एकही संघ मोराेक्को संघाविरुद्ध जिंकू शकला नाही, ना एखादा गोल करू शकला. {पोर्तुगाल पहिल्याच उपांत्यपूर्व फेरीत गारद झाला आहे. यापूर्वी दोन वेळा १९६६ व २००६ मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचला होता, मात्र अंतिम फेरी गाठू शकला नव्हता. {रोनाल्डो या वर्ल्डकपमध्ये ८ सामन्यांत ५७० मिनिटे खेळला. २७ शॉट्स मारले, मात्र पेनल्टीवर एकच गोल करू शकला. {तथापि, त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात कुवेतच्या बदेर अल मुतावा याच्या विक्रमाशी बरोबरी केली. हा रोनाल्डोचा १९६ वा आंतरराष्ट्रीय सामना होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.