आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजायंट किलर माेराेक्काे संघाने फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत इतिहास रचला. या अरब-आफ्रिकन फुटबाॅल संघाने यंदा कतारमध्ये आयाेजित वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठली. या संघाने उपांत्यपूर्व फेरीत राेनाल्डाेच्या पाेर्तुगाल संघावर मात केली. युसूफ नेसरीच्या (४२ वा मि.) गाेलच्या बळावर माेराेक्काे संघाने १-० ने पाेर्तुगालला धूळ चारली. आता या विजयासह माेराेक्काे संघाने यंदाचा विश्वचषक आपलाच असल्याचे संकेत दिले. याच दिशेने सध्या या आफ्रिकन फुटबाॅल संघाची आगेकूच सुरू आहे. माेराेक्काे संघाने यंदा विश्वचषकादरम्यान जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बेल्जियम, क्रमवारीतील नवव्या स्थानावरील पाेर्तुगाल, माजी चॅम्पियन स्पेन व गत उपविजेत्या क्राेएशियाला धूळ चारली. माेराेक्काेला अंतिम चारचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला. ‘एटलस लाॅयन्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रशिक्षक वेलिड रेग्रागुई यांच्या मार्गदर्शनाखाली माेराेक्काे संघाने एेतिहासिक यश मिळवले.
माेराेक्काेची राजधानी रबातमध्ये दिवाळी साजरी तारिक पंजा | अरेबियन फुटबाॅल संघ माेराेक्काेने सनसनाटी विजयाची लय कायम ठेवताना जागतिक दर्जाच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवला. हे अरब आणि आफ्रिकन फुटबाॅल संघांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे. माेराेक्काे संघाच्या याच एेतिहासिक विजयाने सध्या राजधानीचे शहर रबातमध्ये दिवाळी साजरी हाेत आहे. माेराेक्काेमधील नागरिक आणि फुटबाॅलप्रेमी सध्या रस्त्यावर उतरून राष्ट्रीय संघाचा विजय माेठ्या उत्साहात साजरा करत आहे. ‘आमच्या संघातील सर्वांसाठी हे स्वप्नवत वाटणारे यश आहे. पाेर्तुगाल संघाला नमवून वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठण्याचे माेठे यश हे आम्हाला अजूनही खरे वाटत नाही. ही आफ्रिकन संघांसाठी आतापर्यंत अशक्यप्राय गाेष्ट मानली जात हाेती. जगभरातील चाहत्यांच्या पाठबळामुळे आत्मविश्वास उंचावला आहे, अशी प्रतिक्रीया गाेलरक्षक बाेनाेऊने दिला.
कुटुंबीयांच्या पाठबळाने माेराेक्काेचे खेळाडू ठरले स्टार विश्वचषकादरम्यान माेराेक्काे संघातील खेळाडूंना कुटुंबीयाचे माेलाचे पाठबळ मिळाले. त्यामुळेच हेच खेळाडू स्पर्धेदरम्यान स्टार ठरले. आमचा संघ हा मेसीसारखा आहे. जगभरातील काेट्यवधी फुटबाॅलप्रेमींचे आम्हाला पाठबळ मिळत आहे. यातूनच आव्हानात्मक वाटणाऱ्या परिस्थितीवर मात करण्याचे बळ आम्हाला मिळत आहे. यातून आम्ही निश्चितपणे पदकापर्यंतचा पल्ला गाठू, असा विश्वास माेराेक्काे फुटबाॅल संघाचे काेच वेलिद यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.