आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:प्रसिद्धीपासून दूर राहायचा धोनी, निवृत्तीसाठीही निवडली आजची खास तारीख

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. शनिवारी धोनीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत लिहीले की, तुमचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. आज संध्याकाळी 7. 29 पासून मला निवृत्त झालो असल्याचे समजा. धोनीने आपल्या निवृत्तीची घोषणा करण्याच्या एका तासातच क्रिकेटर सुरेश रैना यानेही आपल्या निवृत्तीची घोषणा केली. रैनानेही इंस्टाग्राम पोस्टद्वारे याची माहिती दिली.

भारताला 28 वर्षानंतर विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने आज आपल्या इंस्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली. धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 2019 मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या सेमी फायनलनंतर धोनी मैदानात उतरला नाही. यादरम्यान त्याच्या निवृत्तीवर अनेक चर्चा झाल्या. पण, धोनीने कधीय यावर आपली प्रतिक्रीया दिली नाही. हिच धोनीची खासियत आहे. धोनी नेहमी प्रसिद्धी आणि कॉन्ट्रोव्हर्सीपासून दूर राहतो. धोनीने आजची तारीख निवडण्यामागेही हेच कारण आहे. आज 15 ऑगस्ट आहे आणि उद्या सर्व वृत्तपत्रांना सुट्टी असते. आपल्या निवृत्तीची चर्चा होऊ नये, यामुळेच धोनीने आजची तारीख निवडली असावी.

साध्या पद्धतीने केले लग्न

धोनी कधीच कोणत्या पार्टीमध्ये किंवा मोठ्या इव्हेंटमध्ये दिसत नसे. तसेच, धोनी कधीच कोणत्या वादात अडकला नाही. त्याला या सर्व गोष्टी आवडत नाहीत. भलेही धोनी अनेक जाहिरातींमध्ये झळकायचा, पण त्याने कधीच स्वतःच्या फायद्यासाठी माध्यमांचा वापर केला नाही. अभिनेता कपिल शर्माने मागे एकदा सांगितले होते की, त्याने अनेकवेळा धोनीला आपल्या कार्यक्रमात बोलवले होते, पण धोनीने दरवेळेस येण्यास नकार दिला. यावरुन समजते की, धोनीला स्वतःचा प्रचार करणे आवडत नाही. धोनीचा साधेपणा त्याच्या लग्नातही दिसला होता. धोनीने 4 जुलै 2010 रोजी साक्षीसोबत लग्न केले होते. धोनीने आपले लग्नही एकदम साध्या पद्धतीने करत कोणताही गाजावाजा केला नव्हता. अखेर आज धोनीने आपल्या निवृत्तीची घोषणा एकदम साध्या पद्धतीने केली.

धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध जूलैमध्ये खेळला आहे.

गांगुली कॅप्टन्सीमध्ये केला डेब्यू

धोनीने पहिला मॅच 23 डिसेंबर 2004 मध्ये बांग्लादेशविरोधात चटगावमध्ये खेळला होता. तेव्हा गांगुली संघाचा कर्णधार होता. गांगुलीने आपल्या ऐवजी धोनीला नंबर-3 वर बॅटिंगसाठी पाठवले होते. परंतू, धोनी त्या सीरीजमध्ये फ्लॉप ठरला होता. त्याने तीन सामन्यात फक्त 19 धावा काढल्या होत्या, परंतू पुढच्या सीरीजमध्ये पाकिस्तानविरोधात 123 बॉलवर 148 धावांचा डोंगर केला होता.

90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी-20 खेळले

धोनीने आतापर्यंत 90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 4876, 10773 आणि 1617 धावा केल्या. धोनीने आयपीएलमध्ये आतापरयंत 190 सामन्यात 4432 धावा केल्या. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये सीएसकेने सलग 2010 आणि 2011 मध्ये आयपीएल किताब आपल्या नावे केला होता.

बातम्या आणखी आहेत...