आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार एमएस धोनीला एका चाहत्याने चेपॉक स्टेडियमचे लघु मॉडेल भेट दिले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता धोनीला चेपॉक स्टेडियमचे एक लघु मॉडेल भेट देताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हे मॉडेल एका टेबलाच्या वर ठेवलेले आहे आणि धोनी त्याच्याजवळ स्मितहास्यात उभा आहे. धोनीने त्या चाहत्यासोबत फोटोही क्लिक केले आहेत. 'मिनिएचर वर्ल्ड मॉडेल मेकर्स' नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून हे मॉडेल शेअर करण्यात आले आहे. दरम्यान, धोनीच्या नेतृत्वाखाली CSK संघ चार वेळा चॅम्पियन बनले आहे.
चालू हंगामातील धोनीची सीएसके टीम प्लेऑफमध्ये
धोनीच्या सीएसकेने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चालू हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या संघाने शनिवारी त्यांच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव केला. अरुण जेटली मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 3 गडी गमावून 223 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचे फलंदाज 20 षटकांत 9 गडी गमावून 146 धावाच करू शकले.
धोनीने प्रेक्षकांमध्ये जर्सी आणि टेनिस बॉलचे केले वाटप
यापूर्वी, 14 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर या आयपीएल हंगामातील शेवटच्या लीग स्टेज सामन्यानंतर धोनीने जर्सी आणि टेनिस बॉलचे वाटप करून प्रेक्षकांचे आभार मानले होते. यादरम्यान समालोचक आणि माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनीही धोनीचा शर्टावरील ऑटोग्राफ घेतला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.