आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • MS Dhoni Reaction On Sushant Update | MS Dhoni Biopic Fame Sushant Singh Rajput Suicide Death News Updates On Mahendra Singh Dhoni Reaction

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आणि धोनी:टीव्हीवर धोनीची मॅच पाहण्यासाठी सुशांत क्लास बंक करायचा, बायोपिकसाठी 'माही'चे हजार व्हिडिओ पाहिले होते

स्पोर्ट डेस्क10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो 2016 चा आहे. 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये धोनी सुशांतसोबत उपस्थित होता. - Divya Marathi
हा फोटो 2016 चा आहे. 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये धोनी सुशांतसोबत उपस्थित होता.
  • सुशांतने सांगितले होते की - एमएस धोनीची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणे खूप कठीण होते
  • 2016 मध्ये धोनीचा बायोपिक रिलीज होण्यापूर्वी सुशांतने अनेक प्रमोशनल इवेंट्स केले होते

सुशांतसिंग राजपूत आता आपल्यात राहिला नाही. रविवारी त्याने मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्याच्या निधनावर दुःख व्यक्त केले. सचिन तेंडूलकरसह अनेक क्रिकेटपटू, अभिनेते आणि इतर सेलिब्रिटींनी सुशांतच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉक बस्टर ठरला होता. दरम्यान सोमवारी दुपारपर्यंत धोनीची कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.  

चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अनेक प्रमोशनल इवेंट्स केले. अनेक रोचक गोष्टींचा खुसाला केला. पडद्यावर धोनीची व्यक्तिरेखा साकारणे किती अवघड होते हेदेखील सांगितले.

सुशांत 2004 पासून होता धोनीचा चाहता 

सुशांतच्या मते, तो 2004 पासून धोनीचा चाहता होता. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात असताना भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी त्याने क्लास बंक केला होता. या सामन्यात धोनीने शतक झळकावले होते. तेव्हा धोनीचे मोठे केस असायचे. सुशांतने देखील तशी हेअर स्टाइल केली होती. सुशांत 2007 मध्ये धोनीला एक चाहता म्हणून भेटला होता. तेव्हा एक सेल्फी घेतला होता. तो सेल्फी नेहमीच सुशांतच्या फोनमध्ये सेव्ह होता. 

20 मिनिटांत धोनीच्या भूमिकेसाठी झाली निवड 

सुशांतला पडद्यावर धोनी बनणे जितके कठीण वाटले, तितक्या सहजरित्या त्याला ही भूमिका मिळाली होती. सुशांतनुसार, प्रॉडक्शन टीमने त्याची केवळ 20 मिनिटात या भूमिकेसाठी निवड केली होती. ही भूमिका इतक्या सहजपणे त्याला कशी मिळाली याबद्दल स्वत: सुशांतला आश्चर्य वाटले होते. सुशांतने म्हटले होते की, सर्वप्रथम, धोनी इतरांपेक्षा वेगळा कसा विचार करतो, त्याच्यात काय वेगळेपण आहे हे मला समजायचे होते. 

धोनीच्या घरी देखील राहिला

सुशांतने एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरीच्या शूटिंग सुरू होण्यापूर्वी 13 महिने तयारी केली. काही दिवसांसाठी तो धोनीच्या रांची येथील घरी देखील राहिला. रिपोर्ट्सनुसार, धोनीने स्वतः सुशांतला आपल्या बोलावले होते. 

दोन बोटे तुटली

धोनीसारखी विकेटकीपिंग शिकण्यासाठी सुशांत भारताचा माजी विकेटकीपर किरण मोरे यांच्याकडे गेला. सुशांतने सांगितले होते की, मोरे सरांसह तो दररोज 6 तास घालवत होता. मग हे समजले की जे आपण टीव्हीवर सहज पाहतो ते किती अवघड काम आहे. एका सेकंदात बॉल आपल्याकडे येतो. सरावादरम्यान माझी दोन बोटे तुटली होती. 

एक हजार इंटरव्ह्यू पाहिले 

सुशांतला नीतू सिंग नावाची एक बहीण आहे. नीतू स्वतः कॉलेज स्तरावर खेळली आहे. सुशांतने म्हटले होते की, माझी बहीण मला म्हणते की, मी खऱ्या आयुष्यात क्रिकेटपटू झालो नसलो तरी पडद्यावर चांगले काम केले. सुशांतने म्हटले होते की, धोनीची हालचाल करण्याची शैली, त्याचे हसणे, उठणे आणि बसणे या गोष्टी समजून घेण्यासाठी मी त्याचे सुमारे एक हजार व्हिडिओ पाहिले.

बातम्या आणखी आहेत...