आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुश्ताक अली:मुंबई चॅम्पियन ; हिमाचलवर 3 गड्यांनी मात

काेलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर तनुष काेटीनने (३/१५, ९ धावा) अष्टपैलू खेळीतून मुंबई संघाला ऐतिहासिक ईडन गार्डनवर सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी टी-२० स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळवून दिला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मंुंबई संघाने शनिवारी ऋषी धवनच्या हिमाचल प्रदेश टीमला धूळ चारली. मुंबई संघाने १९.३ षटकांत ३ गड्यांनी अंतिम सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना हिमाचल प्रदेश संघाने ८ बाद १४३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मंुंबई संघाने ३ गडी आणि ३ चेंडू राखून दणदणीत विजयाची नाेंद केली. मुंबई संघाच्या विजयामध्ये युवा फलंदाज यशस्वी जायस्वाल (२७), श्रेयस अय्यर (३४) व सरफराज खान (नाबाद ३६) यांनी माेलाचे याेगदान दिले. मुंबई संघाने पहिल्यांदाच या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळवला. तसेच हिमाचल प्रदेश संघही पहिल्यांदाच उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. मुंबई संघाकडून गाेलंदाजीमध्ये माेहित अवस्थी (३/२१), सामनावीर तनुष काेटीन (३/१५), शिवम दुबे (१/१६) आणि अमन खानची (१/२४) कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे हिमाचल प्रदेशचा माेठ्या धावसंख्येचा प्रयत्न अपुरा ठरला.

दाेन्ही संघांचे कर्णधार फ्लाॅप : मुंबई व हिमाचल प्रदेश संघांचे कर्णधार अंतिम सामन्यामध्ये सपशेल अपयशी ठरले. त्यांना एक धावा काढून पॅव्हेलियन गाठावे लागले. हिमाचल प्रदेशचा कर्णधार ऋषी धवन (१) शिवमच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यापाठाेपाठ मुंबईच्या कर्णधार रहाणेला (१) कर्णधार ऋषीने बाद केले. यासह दाेन्ही कर्णधार अपयशी ठरले.

बातम्या आणखी आहेत...