आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders 2020 Match 32nd Live Cricket Score And Latest Updates

MI vs KKR LIVE:मुंबई इंडियंसकडून कोलकाता नाइट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव; या विजयासह मुंबई गुणतालिकेत टॉपवर, डिकॉकचे IPL मध्ये 13वे अर्धशतक

अबु धाबी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 32वा सामना आज मुंबई इंडियंस (एमआय) आणि कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)दरम्यान अबु धाबीमध्ये झाला. केकेआरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मुंबईला 149 रनांचे टार्गेट दिले होते. मुंबईने अवघ्या 16.5 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठले.लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा...

मुंबईचा ओपनर क्विंटन डिकॉकने आयपीएलमध्ये आपले 13वे अर्धशतक लगावले. डिकॉक सर्वाधिक 78 रनांवर नॉट आउट राहिला. हार्दिक पंड्या 21 रन काढून नॉट आउट राहिला. कप्तान रोहित शर्माने 35 तर सूर्यकुमार यादवने 10 रन केले. केकेआरच्या शिवम मावी आणि वरुण चक्रवर्तीला एक-एक विकेट मिळाली.

केकेआरने पावर-प्लेमध्ये 2 विकेट गमावले

कोलकाताची खूप खराब सुरुवात झाली. ओपनर राहुल त्रिपाठी 7 रनांवर ट्रेंट बोल्टच्या बॉलवर आउट झाला. यानंतर नीतीश राणा (5)ला नाथन कुल्टर-नाइलने माघारी पाठवले. केकेआरने पावर-प्ले मध्ये 2 विकेट्सवर अवघे 33 रन केले. कोलकाताकडून पॅट कमिन्सने 53 आणि इऑन मॉर्गनने 39 धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणत्याच खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही.

गिल-कार्तिकदेखील चालले नाही

केकेआरचे कर्णधारपद सोडणाऱ्या कार्तिकही या सामन्यात काही खास करू शकला नाही. कार्तिकने 8 बॉलवर 4 रन काढले. त्याला राहुल चाहरने आउट केले. याच्या आधीच्या बॉलवर चाहरने शुभमन गिलला 21 धावांवर आउट केले.

पावर-प्लेमध्ये मुंबईचे बॉलर्स सर्वात घातक

सीजनमध्ये मुंबई इंडियंसच्या गोलंदाजांचे प्रदर्शन खूप चांगले राहिले आहे. टीमच्या बॉलर्सने पावर-प्लेमध्ये 23.33 च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या आहेत.

बोल्टच्या आयपीएलमध्ये 50 विकेट पूर्ण

ट्रेंट बोल्टने आयपीएलमध्ये आपल्या 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. बोल्टने 41 सामन्यात हा विक्रम केला. लीगमध्ये बोल्टची इकोनॉमी 8.59 आहे.

दोन्ही संघ

कोलकाता : राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नीतीश राणा, इयोन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, क्रिस ग्रीन, पैट कमिंस, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आणि प्रसिद्ध कृष्णा.

मुंबई : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, नाथन कुल्टर-नाइल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी

आजच्या विजयासह रोहित शर्माचा मुंबई इंडियंस पॉइंट्स टेबलमध्ये अव्व स्थानी आला आहे. मुंबईने या सीजनमध्ये आतापर्यंत 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईचे एकूण 12 पॉइंट आहेत.

बातम्या आणखी आहेत...