आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिल्या सत्राच्या महिला प्रीमियर लीगला शनिवारपासून सुरुवात हाेत आहे. याच लीगच्या माध्यमातून आता महिलांच्या प्राेफेशनल क्रिकेट युगाचा उदय हाेत आहे. या लीगला गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सलामी सामन्याने सुरुवात हाेणार आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजेपासून हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. जागतिक दर्जाच्या स्पर्धेत आपल्या उल्लेखनीय खेळीतून महिला क्रिकेटपटू जगभरातील मैदाने गाजवत आहेत.
मुंबई इंडियन्स : स्वत:च्या हिमतीवर विजयाचीक्षमता; वेगवान गाेलंदाजीत अपयशी : बलस्थान : मुंबई संघामध्ये एमाेलिया केर आणि हॅली मॅथ्यूज यांच्या रूपामध्ये जगातील सर्वाेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सहभागी आहेत. मॅथ्यूज, कर्णधार हरमनप्रीत, ब्रंट आणि केर यांच्यात स्वत:च्या हिमतीवर सामना जिंकण्याची प्रचंड क्षमता आहे. दुबळेपणा : मुंबई संघाची वेगवान गाेलंदाजी ही भरवशाची नाही. संघाकडे यासाठी ठाेस असा पर्याय नाही. इसाबेल वाेंगच्या रूपात मुंबईकडे एकमेव वेगवान गाेलंदाज आहे. पूजा वस्त्रकार, हीथर ग्राहम, अमनज्याेत, कलितासारख्या ऑलराउंडर आहेत. गुजरात जायंट्स : स्फाेटक फलंदाजांमुळे मजबूत; दडपणात वेगवान गाेलंदाजी ठरते फ्लाॅप बलस्थान : बेथ मुनी, साेफिया डंकले, अॅश्ले गार्डनर, डिएंड्रा डाॅटिनसारख्या स्फाेटक फलंदाजांमुळे गुजरात संघ मजबूत आहे. गार्डनर, जार्जिया वारेहम, स्नेह राणा, हरलीन देआेलसारख्या मजबूत व अनुभवी फिरकीपटू गुजरात संघात आहेत. दुबळेपणा : गुजरात संघातील वेगवान गाेलंदाजांमध्ये अनुभवाचा अभाव आहे. ऑस्ट्रेलियाची एनाबेल ही एकमेव अनुभवी पेसर आहे. मात्र, इतर वेगवान गाेलंदाज ह्या नवख्या आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात ही गाेलंदाजी अपयशी ठरण्याचा माेठा धाेका आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.