आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mumbai's 5th Win In A Row, Gujarat Defeated By 55 Runs, Brunt Healy 3 Wickets Each

महिला प्रीमियर लीग:मुंबई संघाचा सलग पाचवा विजय, गुजरातचा 55 धावांनी पराभव, ब्रंट-हिलीचे प्रत्येकी 3 बळी

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरात जायंट्स संघाने गमावला चाैथा सामना

सामनावीर कर्णधार हरमनप्रीत काैर (५१) आणि गाेलंदाज ब्रंट (३/२१), हिली मॅथ्यूज (३/२३) यांनी दर्जेदार कामगिरीतून मुंबई इंडियन्स संघाचा पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगमध्ये सलग पाचवा विजय साजरा केला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने स्पर्धेतील आपल्या पाचव्या सामन्यामध्ये मंगळवारी स्नेह राणाच्या गुजरात जायंट्स संघावर ५५ धावांनी मात केली. यासह मुंबई संघाला आपली विजयी माेहीम कायम ठेवता आली. दरम्यान, गुजरात संघाला स्पर्धेत चाैथ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १६२ धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये गुजरात महिला संघाला निर्धारित २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या माेबदल्यात १०७ धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरात संघाला सुमार फलंदाजीमुळे लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. संघाकडून हरलीनने सर्वाधिक २२ धावा काढल्या. तसेच संघातील तिघींना सामन्यात भाेपळाही फाेडता आला नाही.

बंगळुरू संघासमाेर आज यूपी वाॅरियर्जचे आव्हान
सलगच्या पाच पराभवांमुळे राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची आता महिला प्रीमियर लीगमधील वाट अधिकच खडतर झाली आहे. स्मृतीच्या नेतृत्वाखाली या संघाला आज बुधवारी यूपी वाॅरियर्ज टीमच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. बंगळुरू व युुपी वाॅरियर्ज हे दाेन्ही संघ डीवाय पाटील स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजेपासून समाेरासमाेर असतील. बंगळुरू संघाला अद्यापही विजयाचे खाते उघडता आले नाही.

बातम्या आणखी आहेत...