आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:2017 नंतर पहिल्यांदा मरे-नोवाक योकोविक सामना

माद्रिद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरे आता कोर्टवर दमदार पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याने शानदार खेळीतून माद्रिद आेपन टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. मात्र, आता त्याला जगातील नंबर वन नोवाक योकोविकच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. तब्बल २०१७ नंतर हे दोन्ही टेनिसपटू पुरुष एकेरीच्या सामन्यामध्ये समोरासमोर येत आहेत. इंग्लंडचा ३४ वर्षीय टेनिसपटू अँडी मरेने एकेरीच्या सामन्यामध्ये कॅनडाच्या डेनिस शापाेवालाेवचा ६-१, ३-६, ६-२ ने पराभव केला. सर्बियाच्या नोवाक योकोविकने एकेरीच्या सामन्यामध्ये फ्रान्सच्या गेल मोफिल्सचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. त्याने ६-३, ६-२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली. आता त्याचा सामना मरेशी होणार आहे. योकोविक आणि मरे यांच्यात अातापर्यंत जवळपास ३६ सामने झाले आहेत. यातील २५ सामने योकोविकने जिंकले.

जेबूरचा सनसनाटी विजय :
आठव्या मानांकित जेबूरने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये सनसनाटी विजयाची नोंद केली. तिने माजी नंबर वन सिमोना हालेपला ६-३, ६-२ ने धूळ चारली.

बातम्या आणखी आहेत...