आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्लिन:युरोपात म्युझिक उत्सव; 1.6 लाख रसिकांची गर्दी

बर्लिनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे बंद असलेल्या युरोपातील रॉक व पॉप संगीताच्या उत्सवाला दोन वर्षांनंतर सुरुवात झाली. जर्मनीच्या पश्चिमेकडील इफेल या डोंगराळ भागात नूरबर्गिंग रेसट्रॅक येथे सर्वात मोठा म्युझिक फेस्टिव्हल आयोजित केला जातो. गेल्या दोन वर्षांत दोन वेळा हा उत्सव रद्द झाला होता. त्यामुळे त्याला जर्मनीच्या संस्कृती परिषदेने आयोजनाची जोखीम लक्षात घेऊन ते रद्द केल्याचे स्पष्ट केले होते. परंतु निर्बंध हटताच ३ ते ५ जूनदरम्यान रॉक पार्कमध्ये धूम पाहायला मिळाली. त्यात ७० हून जास्त बँडने सादरीकरण केले. या कार्यक्रमात १.६० लाखाहून जास्त रसिकांनी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित संगीताचा आस्वाद घेतला. त्यानंतर युरोपात संगीत महाेत्सवाला सुरुवात झाली.

25 जून ते २ जुलैपर्यंत डेन्मार्कमध्ये रोस्किल्डे उत्सव साजरा केला जाणार. 10 जून ते १२ जूनपर्यंत मेल्ट फेस्टिव्हलमध्ये हिप-हॉप कार्यक्रम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...